Weather Update : मुंबईसह उपनगरांना अतिवृष्टीचा इशारा; पुढचे २ दिवस महत्वाचे, ऑरेंज अलर्ट जारी

Maharashtra Weather : राज्यात यंदा मान्सून उशिरा दाखल झाला आहे. त्यामुळे गेल्या दोन दिवसांपासून पावसाने मुंबईला झोडपलंय. मुंबईसह उपनगरांमध्ये पुढचे दोन दिवस पाऊस असाच कायम राहण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. त्यामुळे मुंबईकरांची आणखीन दाणादाण होण्याची शक्यता आहे. 

२ दिवस ऑरेंज अलर्ट

नैऋत्य मोसमी वारे संपूर्ण मुंबईभर पसरले आहेत. त्यामुळे पुढील दोन दिवस मुंबईसाठी महत्वाचे असणार आहेत. २८ आणि २९ जून रोजी मुंबई, ठाणे, पालघर, रायगड तसेच कोकण या ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

Maharashtra Monsoon 2023 : अखेर मान्सूनने संपूर्ण महाराष्ट्र व्यापला; हवामान खात्याची माहिती, पुढील २४ तास धोक्याचे

सोमवारी घेतली विश्रांती

सोमवारी देखील मुंबईला अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला होता. मात्र सोमवारी पावसाने विश्रांती घेतली. सोमवारच्या विश्रांतीनंतर आज मंगळवारी पुन्हा एकदा पावसाने जोर धरला आहे. काल रात्री देखील मुंबईच्या काही उपनगरांमध्ये मुसळधार पाऊस पडला.

काल पाऊस  जास्त नसल्याने हवामान विभागाच्या कुलाबा केंद्रात पावसाची नोंद झाली नाही. सांताक्रूज केंद्रात २७.० मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे. मुंबई, ठाणे आणि रत्नागिरी जिल्ह्यांना मंगळवारी अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलाय.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply