
Pune : उन्हाची तीव्रता आणि उकाड्याने हैराण पुणेकरांना बुधवारी संध्याकाळी झालेल्या पावसाने सुखद दिलासा मिळाला. जिल्ह्यातही अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावली. पुढील दोन दिवस शहरात दुपारनंतर आकाश ढगाळ राहणार असून, मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह हलक्या पावसाची शक्यता, भारतीय हवामानशास्त्र विभागाने व्यक्त केली आहे.
पुण्यात विविध भागांत पाऊस
मध्यवर्ती पुण्यासह उपनगरांमध्ये बुधवारी दुपारनंतर आकाशात ढग दाटून आले. वादळी वाऱ्यासह काही भागात हलक्या स्वरूपाच्या पावसाने हजेरी लावली. तापलेल्या जमिनीवर पावसाचे पाणी पडल्यावर क्षणार्धात वातावरणात मातीचा सुगंध दरवळला.
गेल्या पंधरा दिवसांपासून सकाळपासून वाढत जाणारा उन्हाचा चटका आणि उकाड्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. दुपारी रस्त्यावरून फिरतानाही नागरिकांना उन्हाचे चटके जाणवत आहेत. बुधवारी मात्र दुपारनंतर उन्हाची तीव्रता ओसरली आणि सायंकाळी पाचपर्यंत आकाशात ढग दाटून आले. वादळी वारे आणि ढगांच्या गडगडामुळे आता पाऊस हजेरी लावणार या विचारानेही पुणेकरांना दिलासा मिळाला.
पुणे स्टेशन, येरवडा भागात सायंकाळी सहाच्या सुमारास पावसाच्या सरी कोसळल्या, कोथरूड, पाषाण, सिंहगड रस्ता, सातारा रस्त्यावर काही ठिकाणी हलक्या सरी पडल्या.
राज्यात काही ठिकाणी गारपीट
दरम्यान, राज्यातही ठिकठिकाणी पावसाच्या सरी कोसळल्या. दरम्यान, नाशिक जिल्ह्यात गारपिटीसह पाऊस झाला. मराठवाड्यातही गारपिटीसह पावसाने हजेरी लावली. विदर्भातील गडचिरोली जिल्ह्यातही सरी कोसळल्या. या पावसामुळे शेतपिकांचे नुकसान झाले आहे.
या जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी
चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, यवतमाळ, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, लातूर, धाराशिव, पुणे, सोलापूर, सातारा, सांगली, अहिल्यानगर, कोल्हापूर, धुळे, नंदुरबार, नाशिक, जळगाव, रत्नागिरी, रायगड, नांदेड, हिंगोली
शहरात बुधवारी नोंदवलेले तापमान
स्टेशन -कमाल -किमान
(अंश सेल्सिअसमध्ये)
लोहगाव ---३७.८ ---२०.९
शिवाजीनगर ---३५.२ ---१८.५
पाषाण ---३५.५ ---१८.२
चिंचवड ---३५.८ ---२१.४
हवेली ---३३.५ ---१५.६
एनडीए ---३५.१ ---१७.६
आंबेगाव ---३३ ---१६.९
हडपसर ---३२.२ ---२०.८
शहर
- Pune : लेह-लडाखहून परतताना दुर्दैवी अपघात; पुण्यातील तीन मित्रांचा मृत्यू, विमानाने परतलेला चौथा मित्र धक्क्यात
- Pune : पुण्यातील वाहनधारकांसाठी आता नवीन नोंदणी क्रमांकांचे पर्याय उपलब्ध; इंग्रजीतील तीन अक्षरांची सिरीज सुरू करणारे देशातील दुसरे शहर म्हणून पुण्याचा मान.
- एन. रघुरामन यांचा कॉलम:एआय अद्याप कामाच्या ओझ्यापासून सुटका करू शकलेले नाही
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:नूतन वर्ष आध्यात्मिक साधनेसाठी खूप अनुकूल
महाराष्ट्र
गुन्हा
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:नूतन वर्ष आध्यात्मिक साधनेसाठी खूप अनुकूल
- आशुतोष वार्ष्णेय यांचा कॉलम:इराणमधील युद्ध कधी अन् कसे बरे संपेल?
- आरती जेरथ यांचा कॉलम:ऐन निवडणुकीच्या तोंडावरच मतदार यादीवरून वादंग
- अर्घ्य सेनगुप्ता-स्वप्निल त्रिपाठी यांचा कॉलम:धार्मिक व्यवस्थेसाठीदेखील कोर्टाचा आधार कशामुळे?
राजकीय
- मिरज पंचायत समितीत काँग्रेसची बाजी, भाजपच्या बालेकिल्ल्यात आघाडीचा धक्का
- आरती जेरथ यांचा कॉलम:‘आप’ नेत्यांच्या सुटकेनंतर काँग्रेस पक्ष चिंताक्रांत का?
- नवनीत गुर्जर यांचा कॉलम:ट्रम्प, टेरिफ आणि ‘फीनिक्स’ काँग्रेस
- Pune ZP Election : अजित दादांच्या निधनानंतरची पहिलीच निवडणूक; पुणे जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीची कसोटी, विजय मिळाला तरी पुढे काय?
इतर
- सरकार तुमचे बँक खाते गोठवू शकत नाही: आर्थिक संकटाच्या व्हायरल दाव्याची पडताळणी
- नाशिकमध्ये निवडणुकीतील पराभव जिव्हारी, राजकीय नेत्याचा युवकावर कोयत्याने प्राणघातक हल्ला
- राज्यात उन्हाचा कडाका वाढला: उष्माघातापासून बचावासाठी आरोग्य विभागाकडून 'अॅडव्हायजरी' जारी; नागरिकांना सतर्कतेचा इशारा
- Pune- पुणे महापालिकेचा मोठा निर्णय! २३ गावांच्या विकासासाठी ९५४ कोटींचा ‘बूस्टर डोस’
मनोरंजन
- Shahid Kapoor : शाहिद कपूर आणि मीरा राजपूतने पुन्हा खरेदी केलं 'लग्जरी अपार्टमेंट', आलिशान किंमत एकून व्हाल थक्क
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
विडियो गॅलेरी

देश विदेश
- Mumbai : महाराष्ट्रात एलपीजी संकट! पश्चिम आशियातील युद्धामुळे गॅस पुरवठा विस्कळीत; गॅस एजन्सींना पोलीस संरक्षण देण्याचे आदेश
- नांदेडच्या औद्योगिक शिरपेचात मानाचा तुरा! ४,२५० कोटींचा हेलिकॉप्टर प्रकल्प जाहीर; हजारो तरुणांना मिळणार रोजगार
- LPG टंचाई: सिलिंडर वाहनांना पोलीस सुरक्षा द्या आणि तात्काळ 'कंट्रोल रुम' उभारा; राज्य सरकारचे जिल्हाधिकाऱ्यांना कडक निर्देश
- गॅस टंचाई हाताळण्यासाठी केंद्र सरकार सरसावले: हॉटेल्सना पर्यायी इंधन, राज्यांना अतिरिक्त रॉकेल
























Subscribe to my channel



