Weather Update : चक्रीवादळ वाऱ्यांमुळे वातावरणात मोठा बदल; 'या' राज्यात होणार मुसळधार पाऊस, हवामान खात्याने वर्तवला अंदाज

Weather Update : देशात पुन्हा एकदा वातावरणात मोठा बदल झाला आहे. बिहार, झारखंड, छत्तीसगड, उत्तराखंड सहित अनेक राज्यात पाऊस कोसळत असल्याचं पाहायला मिळत आहे. उत्तर-पश्चिम भारतात २५ फेब्रुवारी वातावरणात मोठा बदल होणार आहे. या बदलामुळे गारांसह मुसळधार पाऊस कोसळणार आहे. भारतीय हवामान विभागाने हा अंदाज वर्तवला आहे.

हवामान विभागाच्या माहितीनुसार, पश्चिम उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि अरुणाचल प्रदेश सारख्या भागात मागील २४ तासांत दिवसाचं तापमान १-४ डिग्री सेल्सियसने घसरलं आहे. गुजरात, जम्मू-काश्मीरच्या तापमानतही १ ते ४ डिग्री सेल्सियसने तापमान वाढलं आहे. उत्तर, पश्चिम भारतात पुढील ४ दिवसांत किमान तामपानात २-४ डिग्री सेल्सियसने वाढ होण्याची शक्यता आहे. तर मध्य भारतात पुढील ३ दिवसांत किमान तापमानात कोणताही बदल होणार नाही.

हवामान विभागाच्या नव्या माहितीनुसार, उत्तर इराण आणि शेजारी देशातील चक्रीवादळामुळे वातावरणात दबाव आहे. त्यामुळे पश्चिम हिमालय क्षेत्रातील हवामानात आद्रता जास्त आहे. जम्मू काश्मीर, लडाख, हिमाचल प्रदेश, उत्तराखंडमध्ये २५-२८ फेब्रुवारीदरम्यान मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. हिमाचल प्रदेशात २६ ते २८ फेब्रुवारीपर्यंत मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. तर हिमाचल प्रदेशमध्ये २६ ते २८ फेब्रुवारी तर उत्तराखंडमध्ये २७-२८ फेब्रुवारीपर्यंत पावसाची शक्यता आहे. तसेच बर्फवृष्टी होण्याची देखील शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

New Bat Coronavirus in China : जगावर पुन्हा कोरोनासारखं संकट? चीनच्या व्हायरसमुळे जग चिंतेत

पंजाब, हरियाणा, चंदीगडमध्ये २६ फेब्रवारी ते १ मार्चपर्यंत हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. पश्चिम उत्तर प्रदेश, राजस्थानमध्ये २७ फेब्रुवारी ते १ मार्च, पश्चिम राजस्थानमध्ये २७-२८ फेब्रुवारीपर्यंत पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. पूर्व उत्तर प्रदेश, पूर्व राजस्थानमध्ये २८ फेब्रुवारी-१ मार्चपर्यंत पावसाची शक्यता आहे. अंदमान आणि निकोबार द्विप समूहातही २४ फेब्रुवारी ते २६ फेब्रवारीपर्यंत वादळी वाऱ्यांसह पावसाची शक्यता आहे.

बंगालच्या खाडीवरील चक्रीवादळामुळे वातावरणात बदल झाला आहे. चक्रीवादळामुळे बिहार, ओडिशा, पश्चिम बंगाल, आसाम, मेघायल, मणिपूर, मिझोराम आणि त्रिपुरामध्ये २३ फेब्रुवारी रोजी ३०-४० किलोमीटर प्रती तास वेगाने वारे वाहणार आहेत. तसेच पावसाची देखील शक्यता आहे. इतर राज्यातही २४ फेब्रवारी रोजी शक्यता वर्तवण्यात आली आहे.

सिंधुदुर्गाला गारांचा तडाखा

सिंधुर्दुगाच्या दोडामार्ग तालुक्यातील साटेली भेडशी तिलारी भागात अवकाळी वादळी पावसाचा तडाखा पाहायाला मिळाला. तालुक्यातील काही भागात गारांचा पाऊस पाहायला मिळाला. घोटगे गावात हजारो केळी झाडे वादळी वाऱ्यामुळे मोडून जमीनदोस्त झाली. घोटगे गावाला मोठा फटका बसल्याने पाच मिनिटांत पन्नास हजार केळी भुईसपाट झाली. तर या पावासामुळे वीज पुरवठा खंडीत झाला.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply