Weather Update : पुढील 24 तासांमध्ये मुंबई गारेगार होण्याची शक्यता, हलक्या पावसाचा अंदाज; आजपासून कोकणातील समुद्री पर्यटन बंद

 Weather Update :   मुंबई शहर आणि उपनगरांसाठी पुढील 24 तासांमध्ये हलक्या पावसाची शक्यता असून आकाश अंशत ढगाळ राहण्याचा अंदाज प्रादेशिक हवामान खात्याने वर्तवला आहे. पुढील 24 तासामध्ये कमाल तापमान 34 तर किमान तापमान 29 अंश सेल्सिअस राहील असंही सांगण्यात आलं आहे. आजपासून कोकणातील समुद्री पर्यटन पुढचे तीन महिने बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे पर्यटकांचाही हिरमोड झाल्याचं दिसतंय. 

मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळासह सोसाट्याचा वारा  (40-50 किमी प्रतितास वेग) वाहण्याची शक्यता आहे. या भागात येत्या 24 तासांमध्ये हलका ते  माध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे.

Dhule News : ट्रकचालकाने दुचाकीचालकाला चिरडलं; संतप्त जमावाकडून ट्रकवर दगडफेक

दक्षिण कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, आणि सोसाट्याचा वारा (30-40 किमी प्रतितास वेग), हलका ते  माध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे.

कोकणातील समुद्री पर्यटन बंद 

कोकणातील समुद्र किनारे नेहमीच पर्यटकांना आकर्षित करतात. त्यासाठी देशभरातून आणि राज्यभरातून अनेक पर्यटकांची पसंती कोकण असते. पण आजपासून 31 ऑगस्टपासून पर्यटन बंद असे तीन महिने कोकणातील पर्यटन बंद करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. तसेच मुरूड जंजिरा किल्लाही आजपासून पर्यटकांसाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कोकणात मान्सूनचे आगमन हे 10 जूनपर्यंत होणार असून या ठिकाणी मासेमारीसाठीही बंदी घालण्यात आली आहे. कोकणातील पर्यटन बंद झाल्यामुळे पर्यटकांचा मात्र हिरमोड झाल्याचं दिसतंय. 

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply