Weather Update : शेतकऱ्यांसाठी पुढील ४८ तास धोक्याचे! 'या' राज्यात कोसळणार अवकाळी पाऊस

Weather Update : उत्तर भारतात थंडीची लाट वाढत असताना पुन्हा एकदा शेतकऱ्यांची चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे. भारतीय हवामान खात्याने पुन्हा देशातील अनेक राज्यात अवकाळी पावसाचा इशारा दिला आहे. येत्या ४८ तासात महाराष्ट्रासह अनेक राज्यात अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दरम्यान आता पाऊस पडल्यास रब्बी हंगामातील गहू, हरबरा, करडी इत्यादी पिकांचे नुकसान होण्याची शक्यता आहे.

येत्या ४८ तासांत मध्य महाराष्ट्र, बिहार, झारखंड आणि रायलसीमा या काही ठिकाणी हलका पाऊस होण्याची शक्यता आहे. तर तमिळनाडू, केरळ आणि लक्षद्वीप येथे मुसळधार पावसाची शक्यता आहे. खासगी हवामान अंदाज एजन्सीने हा अंदाज व्यक्त केला आहे.

Sunil Kamble : भाजप आमदार सुनील कांबळे यांच्याविरोधात गुन्हा दाखल; पोलीस कर्मचाऱ्यावर हात उचलणं भोवलं

उत्तर भारतात थंडीचा कडाका!

उत्तर भारतातील अनेक राज्य सध्या कडाक्याच्या थंडीचा सामना करत आहेत. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार पंजाब, हरियाणा, चंदगड, दिल्ली आणि राजस्थान मध्ये पुढील गोन दिवस कोल्ड ते गंभीर कोल्ड डे स्थिती पाहायला मिळणार आहे. तसचे उत्तर पश्चिम भारतातील राज्यात पुढील दोन दिवस भयंकर धुके पाहायला मिळेल. तसेच हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार उत्तर पश्चिमेकडील राज्यात पावसाची शक्यता देखील आहे.

 


मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply