Weather Update : दिवसा उकाडा,रात्री थंडी; नागपूरात अचानक तपमानात झाली घट

Weather Update : राज्यात सध्या थंडी आणि उन्हाळा असे दोन्ही ऋतू अनुभवायला मिळत आहेत. काळी मुंबईसह अन्य शहरांत गुलाबी थंडी जाणवत आहे. तर दुपारी कडक उन्हाळा जाणवतो आहे. उन्हाळ्याला सुरूवात होताच एकीकडे मुंबईकर घामुघूम झालेत. तर दुसरीकडे नागपूरात अचानक पारा घसरत चालला आहे

उन्हाळ्याची चाहूल लागत असताना नागपूरात अचानक पारा घसरला आहे. हवेत गारठा वाढला असून १०.७ किमान तापमानाची नोंद करण्यात आलीये. मुंबईत आणि इतर ठिकाणी मात्र सरासरी तापमानाची नोंद करण्यात आली आहे.

नागपूरमध्ये सरासरी पेक्षा किमान तापमान ४.८ ने घसरले आहे. या ठिकाणी दिवसा उन्हाचे चटके तर रात्री रात्री थंडी वाजत आहे. बदलत्या वातावरणाचा नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे. शहरात अनेक लहान मुलांना सर्दी, खोकला असे आजार जाणवत आहेत.

मुंबईच्या पूर्व आणि पश्चिम उपनगरांमध्येही रात्री आणि पहाटे थंड वारे वाहत आहेत. कोकणात थंडी कायम आहे. येथील तापमान सरासरीपेक्षा खाली घसरले आहे. पुढचे दोन दिवस हे तापमान कायम राहणार असून त्या नंतर कोकणातही कडाक्याचा उन्हाळा सुरू होईल.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply