Weather Update : मुंबई देशातील सर्वात उष्ण शहर; डिसेंबरमध्येही थंडी नाही

Mumbai Weather Update - महाराष्ट्रावर मेंडोस चक्रीवादळाचा मोठा परिणाम झाल्याचे दिसून येत आहे. थंडीचा सर्वात जोर असलेला डिसेंबर महिना अर्धा संपला आहे. मात्र, मुंबईमध्ये ऑक्टोबर हिट प्रमाणे डिसेंबर हिट सुरू असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. डिसेंबरमध्ये मुंबईच्या तापमानात वाढ झाले आहे.

देशातील सर्वात जास्त तापमानाची नोंद मुंबईत झाली आहे. मुंबईत २ दिवसांपूर्वी ऐन थंडीत 35.6 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली. हे देशातील सर्वाधिक तापमान असल्याची माहिती हवामान खात्याने दिली आहे. हवामान खात्यानुसार, संपूर्ण महाराष्ट्रात मुंबईत सर्वाधिक उष्मा जाणवत आहे. तापमानात वाढ झाल्याने उष्णतेने नागरिकांचे हाल होत आहेत.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पुढील 7-8 दिवस मुंबईच्या तापमाणात आणखी वाढ होणार आहे. डिसेंबर महिना सुरु होऊन देखील मुंबईकरांना थंडीची प्रतीक्षा करावी लागत आहे.पुढच्या 7-8 दिवस मध्य भारतात महाराष्ट्र सहीत कमाल तापमान वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

यामध्ये कोकण मुंबई, ठाणे 34 अंश सेल्सिअस च्या आसपास राहण्याची शक्यता. २ दिवसांपूर्वी ऐन थंडीत मुंबईत 35.6 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती. मुंबईसह राज्यातील अनेक जिल्ह्यात देखील तापमानात वाढ झाली आहे. पुण्यात 32.3, नाशिक 31.5, डहाणू 31.8 आणि रत्नागिरी 35.4 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद करण्यात आली.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply