Water Shortage : खेडमध्ये अजबच पाणी टंचाई, २ हंडे मोफत पाणी, तिसऱ्यासाठी द्यावे लागतात पैसे


Water Shortage : उन्हाळा लागला कि डोंगरमाळरानावर खडतर वाट काढत पिण्याच्या पाण्यासाठी महिलांचा संघर्ष सुरु झाला आहे. अनेक ठिकाणी पाणीटंचाई आहे. त्यामुळे महिलांना पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. दरम्यान आता फक्ता दोनच हंडे पाणी घ्यायचं तिसरा हंडा पाणी घेणा-या महिलेला ग्रामपंचायतीकडून १०० रुपयांचा दंड लावलाय. यामुळे गावकऱ्यांना मात्र प्रचंड त्रास सहन करावं लागणार आहे. पाणी टंचाईत घोटभर पाण्यासाठी महिलांना शिक्षा देणारं गाव

पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील पडसुल गावात पाणी टंचाईने कहर केलाय. पाण्यासाठी दोन महिन्यापासून गावकऱ्यांचा अजब फतवा निघला. सात परस खोल विहिरीतुन पोटाला पिळा पडेल ऐवढ्या खोलुवरुन पाणी ओढायचं त्यातच दोनच हंडे पाणी घ्यायचं .तिसरा हंडा घेणाऱ्या महिलेला १०० रुपये दंड! त्यामुळे महिलांना आता पाणी पिण्यासाठीही पैसे मोजावे लागणार आहे. ही एक प्रकारची शिक्षाच आहे.

Kunal Kamra : कुणाल कामरा कुठे? मुंबई पोलिसांनी पाठवला समन्स, उत्तर देत म्हणाला...

पाणी टंचाईच्या भीषण संकटात गावक-यांनी पाण्यावर निर्बंध लावलेत. हा प्रकार इथच न थांबता सकाळी ७ ते रात्री १० पर्यंत पाण्यावर पहारा ठेवणारी ही अवस्था आहे. पाणी टंचाईमुळे पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी ग्रामपंचायत दंड सुरु केला खरा पण तीन धरणं असूनही पाणी का नाही? जलजीवन मिशन योजना तीन वर्षांपासून प्रलंबित आहे, आणि सरकार झोपेत आहे. अधिकाऱ्यांना कागदावरच योजना पूर्ण झाल्या दिसतात, पण प्रत्यक्षात तिसरी पिढी पाण्यासाठी डोंगरदऱ्यातून भटकतेय.

राजकारणी निवडणुकीत कोट्यावधी रुपयांच्या पाणी योजना केलेल्या आश्वासनांचा पाऊस पाडतात, पण गावकऱ्यांना पाण्याचा थेंबही मिळत नाही अन आता दंडाची शिक्षा महिलांना मिळतेय, पण खरा दोष कोणाचा असा प्रश्न या निमित्ताने महिला विचारत आहे



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply