Washim News : वाशिमध्ये विदर्भ लोककलावंत संघटनेने घातला शासनाचा गाेंधळ, क्रांतिकारी धरणे आंदाेलनास प्रारंभ

Washim News : लोककलावंत यांच्या विविध मागण्यांच्या पुर्ततेसाठी विदर्भ लोककलावंत संघटना यांच्या वतीने वाशिम जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आपल्या शैलीत क्रांतिकारी धरणे आंदोलन करण्यात आले. या आंदाेलनात जिल्ह्यातील कलावंत मोठ्या संखेने सहभागी झाले होते. 

विदर्भ लोककलावंत संघटना यांच्या वतीने वाशिम जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनात लोककलावंतांना दरमहा किमान ५००० हजार रुपये मानधन द्यावे, पाच वर्षापासून स्थगित असलेल्या जिल्हा वृद्ध साहित्य कलाकार निवड समितीची पुर्ण रचना करून गठण करावे, वृद्ध साहित्य कलाकार निवड समितीमध्ये राजकीय कार्यकर्त्यांचा समावेश न करता केवळ लोककलावंतांना स्थान मिळावे यासह विविध मागण्या करण्यात आल्या आहेत.

INDIA Alliance : इंडिया आघाडीला आणखी एक धक्का! ममतांपाठोपाठ 'आप'नेही साथ सोडली? 'एकला चलो रे'चा नारा

त्यापूर्वी वाशिम जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विदर्भ लोककलावंत संघटना यांच्या वतीने शासनाचा गाेंधळ घालण्यात आला. लाेककलावंतांनी त्यांच्या शैलीत केलेले धरणे आंदोलन लक्षवेधी ठरले. या आंदाेलनात वाशिम जिल्ह्यातील कलावंत मोठ्या संखेने सहभागी झाले होते.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply