Wardha To Mumbai Nishtha Yatra : उद्धव ठाकरेंच्या समर्थनार्थ वर्धा ते मुंबई निष्ठा यात्रा : निहाल पांडे

Wardha To Mumbai Nishtha Yatra : माजी मुख्यमंत्री उबाठा शिवसेनेचा बुलुंद आवाज उद्धव ठाकरे  यांच्या समर्थनार्थ शिवसैनिक वर्धा ते मुंबई निष्ठा यात्रा काढणार आहेत. या यात्रेला शनिवारी (ता. 23) प्रारंभ हाेईल अशी माहिती निहाल पांडे (संस्थापक, अध्यक्ष, युवा परिवर्तन की आवाज संघटना) यांनी पत्रकार परिषदेत दिली. 

ही निष्ठा यात्रा युवा परिवर्तन की आवाज संघटनेचे अध्यक्ष निहाल पांडे यांच्या नेतृत्वात येत्या शनिवारी (ता. 23) वर्धा येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून निघेल. युवा परिवर्तन की आवाज संघटना आणि उद्धव ठाकरे गट शिवसेना या यात्रेत सहभागी होणार आहेत.

Maratha Reservation : सरकारचं शिष्टमंडळ आंतरवाली सराटीत दाखल, चर्चेला सुरवात

वर्धा ते मुंबई 864 किलोमीटर अंतर कापत 9 दिवसात ही यात्रा मातोश्री येथे पोहचणार असल्याची माहिती पांडे यांनी दिली. या यात्रेच्या माध्यमातून बेरोजगारी, उद्योगांची अवस्था, महागाई, शेतकऱ्यांच्या समस्या, घरकुल व आरोग्याच्या समस्या यावर लक्ष वेधले जाणार असल्याचे पांडे यांनी नमूद केले.



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *