Wardha News : कारंजात चार दुकानांना आग; टीव्ही, मोबाईलसह साहित्याचा कोळसा

Wardha News : वर्ध्यातील कारंजामध्ये पहाटेच्या सुमारास चार दुकानांना अचानक आग लागली. या आगीत दुकानातील टीव्ही, मोबाईल, एलसीडी यासह बरेचसे साहित्य जळून साधारण १० ते २० लाखाचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. 

कारंजा येथील मुख्य रस्त्यावरील  मोबाईल शॉपी, पान टपरी, पेढ्याचे दुकान, पत्रावळीच्या दुकानात पहाटेच्या सुमारास आग  लागली. आगीचे कारण आद्यपर्यंत समजू शकले नाही. मोबाईल शॉपी दुकानात टीव्ही, एलसीडी, होम थिएटर, मोबाईल यासह मोबाईलचे साहित्य जळून खाक झाले आहे. इतर बाजूच्या दुकानातील साहित्य देखील जळाले आहे. 

Devendra Fadanvis : 'ग्रीन हायड्रोजन संदर्भात मोठे निर्णय; २ लाख ७६ हजार कोटींचे विक्रमी करार..' देवेंद्र फडणवीस यांची माहिती

दुकानात आग लागल्याची माहिती कळताच आजूबाजूच्या दुकान धारकांनी स्वतःच्या दुकानातून साहित्य बाहेर काढले. आग विझवण्यासाठी आष्टीनगर पंचायतचे  अग्निशमन दल पाचारण करण्यात आले. तसेच खाजगी पाण्याचे टँकर आणून आग विझवण्याचा प्रयत्न केला. नागरिकांची मोठी गर्दी आग विझवण्यासाठी नागरिकांकडून मदत कार्य केल्याने आज सुद्धा नियंत्रणात आली. परंतु या आगीत मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply