Wardha News : समृद्धी महामार्ग बस अपघात प्रकरण; प्रवाशांच्या नातेवाईक न्यायाच्या प्रतिक्षेत, बेमुदत उपाेषणाचा सहावा दिवस

Wardha News : समृद्धी महामार्गावर बुलढाणा जिल्ह्यात झालेल्या भीषण ट्रॅव्हल्स अपघातात २० परिवारातील २५ सदस्यांचा होरपळून मृत्यू झाला होता. पाच महिन्यांचा कालावधी लोटूनही न्याय मिळालेला नाही. या कुटुंबांना न्याय मिळावा यासाठी गेल्या सहा दिवसांपासून कुटुंबियांच्या नातेवाईकांनी बेमुदत उपाेषण सुरु केले आहे.

बुलढाणा जिल्ह्यात समृद्धी महामार्गावर १ जुलै २०२३ रोजी झालेल्या अपघातात २५ जणांचा होरपळून मृत्यू झाला. यामध्ये दोन चिमुकल्यांसह युवकांचा समावेश आहे. या भीषण अपघातामुळे अख्खा महाराष्ट्र हळहळला.

Employees Strike : राज्यातील १७ लाख सरकारी कर्मचारी आजपासून संपावर जाणार; सर्वसामान्यांची कामे खोळंबणार, मागण्या काय?

उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याच्या तत्कालीन पालकमंत्र्यानी अपघाताच्या कारणाची चौकशी करण्याचे आश्वासन दिले होते. तसेच मुख्यमंत्र्यांनी मृताच्या परिवाराला २५ लाखांच्या मदतीची घोषणाही केली होती. परंतु मृतांच्या परिवाराला राज्य शासनाकडून केवळ ५ लाखांची मदत मिळाली आहे.

उर्वरित मदतीबाबत प्रशासकीय यंत्रणांसह सरकारने मौन पाळले आहे. लोकसभा आणि विधानसभेत अपघाताचा मुद्दा उपस्थित होऊनही मृताच्या परिवाराच्या मागणीची दखल घेतली नसल्याने परिवाराने 8 डिसेंबरपासून साखळी उपोषणाला सुरुवात केली आहे. या उपोषणादरम्यान दररोज एक परिवार उपोषणाला बसत आहे. या उपोषणात पुणे, नागपूर, यवतमाळ, अमरावती, वाशिम व वर्धा जिल्ह्यातील परिवार सहभागी झाले आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply