Wardha News : शेतकरी महिला निधी बँकेच्या ठेवीदारांसह कर्मचा-यांचे बेमुदत उपाेषण सुरु

Wardha News : आपले कष्टाचे पैसे मिळावेत यासाठी आज (बुधवार) वर्धा येथील शेतकरी महिला निधी बँकेच्या ठेवीदारांसह कर्मचा-यांनी वर्धा जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ बेमुदत उपोषण सुरु केले आहे. या आंदाेलनास नागरिकांनी देखील पाठिंबा दिला आहे.

शेतकरी महिला निधी बँकेत मोठ्या प्रमाणात ग्राहकांच्या ठेवी अडकल्या आहेत. नागरिकांनी आपल्या ठेवी बँकेत जमा केल्या मात्र संचालकांनी स्वतः मालमत्ता खरेदी करत ग्राहकांना पैसे दिले नाहीत. मागील तीन महिन्यांपासून ग्राहकांसह कर्मचारी पैशासाठी चकरा मारत आहेत.

Akola News : राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या विरोधात बार मालकांचा आक्रमक पवित्रा; बारच्या चाव्या सुपूर्द करत अनोखे आंदोलन

बँकेने ग्राहकांचे पैसे तातडीने द्यावे, संचालक शरद कांबळे व त्यांच्या परिवाराची मालमत्ता जप्त करून ग्राहकांचे पैसे देण्यात यावे, महिला निधी बँकेच्या संचालकांना तात्काळ अटक करण्यात यावी, ग्राहकांची फसवणूक केल्याचं प्रकरण जलद गती न्यायालयात चालवून ग्राहकांचे पैसे मिळवून द्यावेत अशा मागण्या आंदाेलकांच्या आहेत.

 


मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply