Wardha : आरएसएस जिल्हा संघचालक मारहाणप्रकरणी पाच युवक अटकेत, एकाचा शाेध सुरु : एसपी नुरुल हसन

Wardha : आरएसएसच्या जिल्हा संघचालकांना मारहाण केल्याप्रकरणी पाच संशयितांना पाेलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणात आणखी एकाचा शोध सुरु असल्याची माहिती वर्ध्याचे पोलीस अधीक्षक नुरुल हसन यांनी पत्रकार परिषदेत दिली. दरम्यान पाेलिसांच्या आवाहनास प्रतिसाद देत हिंगणघाट शहरातील नागरिकांनी संयम ठेऊन शांतता ठेवली याबद्दल नागरिकांचे पोलीस प्रशासनाने आभार मानले.

हिंगणघाट येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जिल्हा संघचालक जेठानंद राजपूत यांना काही युवकांनी बस मधून उतरवून मारहाण केली होती. पोलिसांनी शोधकार्य करीत बारा तासांत पाच संशयित आरोपींना अटक केली आहे. एकूण सहा संशयित आरोपी निष्पन्न झाले असून एकास लवकरच अटक करण्यात येईल असं पोलीस अधीक्षक नुरुल हसन यांनी नमूद केले.

Pune : पुणे-मुंबई महामार्गावर 'भारत पेट्रोलियम'चा गॅस टँकर पलटी; अधिकाऱ्यांसह 50 पोलीस घटनास्थळी

जिल्हा संघचालकांवरील हल्ल्याच्या घटनेची गंभीर दखल घेत घटनेच्या दिवशी पोलिसांनी रात्रीच एकाला अटक केली होती. त्यानंतर सोमवारी पोलिसांनी गोपनीय माहिती घेत आणखी चौघांना अटक केली. आता याप्रकरणात अटकेतील संशयित आरोपींची संख्या एकूण पाच झाली आहे.

संशयितांपैकी पाेलिसांनी एकाला न्यायालयात हजर केले असता त्याला न्यायालयाने एक दिवसीय पोलिस कोठडी सुनावल्याची माहिती पोलिस अधीक्षक नुरुल हसन यांनी दिली तसेच एकाचा शोध सुरु असून लवकरच अटक करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply