Wagholi Crime : पूर्वीच्या वादातून चौघांनी एका तरुणाच्या 2 दुचाकी जाळल्या; वाघोलीतील वाघेश्वर नगर मधील घटना

Wagholi Crime :   पूर्वीच्या वादातून चौघांनी एका तरुणाच्या दोन दुचाकी जाळल्याची घटना वाघोलीतील वाघेश्वर नगर मध्ये शनिवारी मध्य रात्री दीड वाजण्याच्या सुमारास घडली, या प्रकरणी चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे

सुधीर लक्ष्मण पेटकर (वय ३४ वर्ष, रा. वाघोली) यांनी फिर्याद दिली आहे. त्यांच्याच दुचाकी जाळण्यात आल्या. तर गणेश दांडे, श्रुतिक येरकर, सुरज पवार, समीर पिल्ले (चौघेही रा. गोरे वस्ती, वाघोली) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पेटकर कुटुंबीय झोपलेले असताना त्याना शनिवारी मध्य रात्री काही तरी आळण्याचा वास व आवाज आला, त्यांनी बाहेर येवून बघितले असता गणेश दांड व इतर तिघांनी पेटकर यांच्या दुचाकी पेटवून दिल्याचे निदर्शनास आले.

त्यांनी त्या चौघांना का दुचाकी पेटवता असे विचारले असता दांडे याने पेटकर यांना शिवीगाळ करून दांडके फिरवत माझ्या नादी लागू नको नाही तर दुचाकी सारखे पेटवून देईल अशी धमकी दिली. यानंतर चौघे निघून गेले, पेटकर कुटुंबीयांनी पाणी टाकून दुचाकीची आग विझाविली, मात्र दुचाकी जाळून खाक झाल्या, रात्रीच ही घटना त्यांनी पोलिसाना कळवली



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply