Voter List : मधून 50 हजार नावं गायब? कल्याण-डोंबिवलीतील जागरूक मतदार हायकोर्टात धाव घेणार

Voter List : निवडणूक आणि मतदार याद्यांचा घोळ हे समीकरण गेल्या अनेक निवडणुकांपासून सुरू आहे. ते नुकत्याच झालेल्या लाेकसभा निवडणुकीतही पाहायला मिळालं. कल्याण आणि भिवंडी लोकसभा मतदारसंघात हजारो नागरिकांची नावे मतदार यादीतून अचानक गायब झाल्याचे चित्र हाेते. दरम्यान मतदार यादीतून नाव गायब हाेणे ही बाब गंभीर असून मतदानाची प्रक्रिया सुरळीत व्हावी यासाठी नागरिकांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याचा निर्धार केला आहे.

लोकशाहीच्या उत्सवात सहभागी होण्यासाठी नागरिक मोठ्या उत्साहात मतदान केंद्रात पोहोचले खरे. हातात त्यांचे वोटिंग कार्ड होते मतदार यादी तपसरी असता त्यांचं नावच मतदार यादीत नव्हतं. अनेकदा त्या मतदार याद्या त्यांनी डोळ्याखालून घातल्या मात्र नाव न दिसून आल्याने या नागरिकांनी आपली नाराजी व्यक्त केली.

Dhule News : चिमुकल्याचा धरणात बुडून मृत्यू; शेळ्या चारण्यासाठी तिघे मित्र गेले होते धरणाच्या काठी

कल्याण डोंबिवली मध्ये अनेक ठिकाणी असा प्रकार दिसून आला. कल्याण पश्चिमेकडील मुंबई विद्यापीठाच्या उपकेंद्रात असलेल्या मतदान केंद्रात याबाबत नागरिकांनी नाराजी व्यक्त करत जोरदार घोषणाबाजी करुन निवडणूक आयोगाचे अक्षरशः वाभाडे काढले.

डोंबिवलीतील जागरूक नागरिक अक्षय फाटक यांनी या प्रकरणात पुढाकार घेतला. जर मी दरवर्षी टॅक्स भरतो. महिन्याला मला पेन्शन मिळते. सरकार मी जिवंत आहे, मी नागरिक आहे हे मान्य करते मग मला मतदार यादी बघायची गरज का लागते हा मुळात प्रश्न आहे असे फाटक यांनी नमूद केले. त्यामुळे मतदानाच्या प्रक्रिया सुरळीत व्हावी यासाठी याचिका दाखल करणार आहे असेही फाटक यांनी स्पष्ट केले.

फाटक म्हणाले मतदार यादीतून ज्यांची नावे वगळण्यात आली आहेत. त्यांच्यासाठी एक गुगल फॉर्म तयार करुन त्यांची माहिती मागविली जात आहे. आत्तापर्यंत काही मतदारांची नावे मिळाली आहेत. फक्त १४३ मतदारसंघातून 50 हजार नावे मतदार यादीतून डिलिट झालेली आहेत. या विषयी हायकोर्टात रिट पिटीशन दाखल करण्याचे ठरविले आहे.

जवळपास ९० टक्के लोक यात नावे देण्यात तयार आहेत. वकिलांसोबत चर्चा करून संदर्भातला निर्णय घेणार आहे. दरम्यान या पावित्र्यामुळे निवडणूक आयोग व न्यायालय काय निर्णय घेणारे हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply