Vitthal Mandir : आषाढीला भाविकांना दिसेल मंदिराचे मूळ रूप; विठ्ठल मंदिराच्या गाभाऱ्याचे काम पूर्ण

Vitthal Mandir : महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिराला सातशे वर्षापूर्वीचे मुळ रूप देण्याचे काम सुरू असून विठ्ठल आणि रूक्मिणीच्या गाभाऱ्याचे काम पूर्ण झाले आहे. यामुळे यंदाच्या आषाढी यात्रेत भाविकांना मंदिराचे मूळ रूप पाहता येणार आहे. 
 
पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिराचे जतन आणि संवर्धनाचे काम सुरू आहे. यासाठी राज्य शासनाने ७४ कोटी रूपयांचा निधी दिला आहे. मागील अडीच महिन्यांपासून हे काम सुरू आहे. आतापर्यंत मंदिरातील जवळपास ८० टक्के काम पूर्ण झाले आहे. मंदिराच्या गाभाऱ्याचे काम पूर्णत्वास नेण्यासाठी कमला गती देण्यात आली असून आषाढी यात्रेपर्यंत हे काम पूर्ण काकारण्यात येणार आहे. यामुळे आषाढी यात्रेनिमित्ताने दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना मूळ रूपातील विठ्ठल मंदिर पाहता येणार आहे. 
 
मुख्यमंत्रांच्या हस्ते महापूजा 
यंदाची आषाढी एकादशी पुढील महिन्यात १७ जुलैला आहे. आषाढीनिमित्ताने लाखोंच्या संख्येने भाविक पंढरपुरात येत असतात. या दिवशी पहाटे विधिवत पूजा केली जात असते. त्यानुसार नव्या रुपातील विठ्ठल मंदिरात येत्या १७ जुलै रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आषाढीची शासकीय महापूजा होणार आहे.

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply