Vishwas Nangare Patil : IPS अधिकारी विश्वास नांगरे पाटील यांच्या नावाने मेसेज आलाय, सावधान! स्वतःच दिली धक्कादायक माहिती

Vishwas Nangre Patil : सायबर गुन्हेगार नवनवे मार्ग अवलंबून फसवणूक करीत आहेत. एखाद्याचा मोबाईल हॅक करून किंवा सोशल मीडियावर बनावट खाते तयार करून लुटण्याचे अनेक प्रकार उघडकीस आले आहेत. सायबर क्राईमबाबत एक आता मोठी बातमी समोर आली आहे. 

आयपीएस अधिकारी व लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे अप्पर पोलिस महासंचालक विश्वास नांगरे पाटील यांचे बनावट फेसबुक अकाउंट बनवण्यात आल्याची घटना समोर आली आहे.

स्वत: विश्वास नांगरे पाटील यांनी फेसबुक पोस्टमधून याबाबतची माहिती दिली आहे. या प्रकरणी सायबर पोलिस अधिक तपास करत आहेत.

या संबंधी विश्वास नांगरे पाटील यांनी त्यांच्या अधिकृत फेसबुक अकाऊंटवरुन पोस्ट शेअर करत या बनावट अकाऊंटची माहिती दिली आहे. 

फेसबुक पोस्ट करत त्यांंनी लिहिले की, ''नमस्कार मित्रांनो, काही घोटाळेबाजांनी माझ्या नावावर बनावट खाते तयार केले आहे. ते माझ्या काही संपर्कांना खाली दिलेले संदेश पाठवत आहेत. मी तातडीने कायदेशीर कारवाई करत आहे. परंतु कृपया प्रतिसाद देऊ नका किंवा कोणत्याही प्रकारची माहिती पाठवू नका. कारण हा फसवणूक करण्याचा प्रयत्न आहे! धन्यवाद...''

सायबर क्राईमच्या अनेक घटना घडत आहेत. यावर आळा घालण्यासाठी पोलिसांची टीम सातत्याने काम करत आहे. फेसबुक, ट्वीटर, इंस्टाग्राम अशा सोशल मीडिया अकाऊंट्सचा वापर करुन दिवसेंदिवस ऑनलाइन गुन्ह्याच्या घटनांचे प्रमाण वाढत चालले आहे. अशात आता आयपीएस अधिकारी विश्वास नांगरे पाटील यांच्यासोबत देखील अशी घटना घडल्याने एकच खळबळ उडाली आहे.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply