Vishrantwadi News : सततच्या पावसामुळे म्हाडा कॉलनीत स्लॅब कोसळला, म्हाडातील घरांच्या दुरवस्थेमुळे नागरिक भयभीत

Vishrantwadi News :  विश्रांतवाडी - दोन ते तीन दिवसांपासून सतत सायंकाळी होत असलेल्या पावसामुळे येरवडा येथील महाराष्ट्र हौसिंग बोर्डमधील आदित्यनारायण सहकारी गृहरचना संस्था मर्यादित एम 24 या इमारतीमधील सी विंगमध्ये छताचा काही भाग कोसळला. यात जीवितहानी झालेली नसली तरी इमारत धोकादायक अवस्थेत असल्यामुळे नागरिक भयभीत झाले आहेत.

प्रत्येकाच्या जिवावर बेतेल अशीच घटना घडलेली आहे. यासंदर्भात येथील रहिवासी व सोसायटीचे अध्यक्ष प्रशांत खंडाळे म्हणाले की पुनर्विकासाची प्रक्रिया सुरू होऊन गेल्या चार-पाच वर्षें होत आलेले आहेत. म्हाडाच्या अधिकार्‍यांनी विकासकाने पैसे भरले की लगेचच ना हरकत प्रमाणपत्र देण्यात येईल असे सांगितले. परंतु काही वैद्यकीय कारणांमुळे त्यांचा चार्ज आत्ताच्या अधिकार्‍यांच्या हातात दिला.

Manoj Jarange Patil : ठरलं तर मग! मनोज जरांगे पाटील पुन्हा उपोषणाला बसणार, ठिकाण आणि तारीखही ठरली

आत्ताचे अधिकारी यांनी आमच्या इमारतीच्या सभासदांना अंडरटेकींगचा फॉर्म भरून मागितला. तोही आम्ही सर्वांनी भरून दिला. प्रीमियमचा एक हप्ता भरूनही जवळपास एक वर्ष झाले, तरी अजून नाहरकत प्रमाणपत्र मिळाले नाही. आता त्यांनी विकसकाचा करार मागितला असून त्यात शंभर टक्के रहिवाशांचा समावेश असावा, असे त्यांचे म्हणणे आहे. येथील काही लोकांनी आपले फ्लॅट भाड्याने दिलेले आहेत.

तर काही परदेशात राहतात, तर काहीजण इतर राज्यांत राहतात. काही लोकांची तब्येत ठीक नाही. त्यामुळे आम्ही हा करार देऊ शकलो नाही, कारण या सर्व गोष्टींना वेळ लागणार आहे. दरम्यान जर काही दुर्घटना घडल्यास, भूकंप झाल्यास, इमारत कोसळण्याची शक्यता आहे. पहिल्याच पावसामुळे वर पाणी झिरपून स्लॅब कोसळत आहे तर पावसाळ्यातसुद्धा अतिशय बिकट अवस्था असणार आहे.

खालून तळमजल्याच्या प्रत्येकाच्या घरामध्ये घुस लागलेली असून इकडे बुजविले की तिकडून घुस खड्डे करीत असून त्यामुळे इमारतीची अवस्था अतिशय खिळखिळी करून टाकलेली आहे. पुनर्विकास करण्यासाठी एक्कावन्न टक्के, साठ टक्के, सत्तर टक्के अशी सभासदांची जरी संमती असेल तरीही चालेल, असे सर्वांना वाटते आहे.

परंतु डेव्हलपमेंट करार हा शंभर टक्के सभासदांनी करून देणे आवश्यक आहे. तरी म्हाडाच्या अधिकार्‍यांनी सहकार्य करून ना हरकत प्रमाणपत्र द्यावे, अशी मागणी त्यांनी केली आहे.

या संदर्भात म्हाडाचे अधिकारी अशोक पाटील यांनी सांगितले की आमच्याकडून प्रक्रिया सुरू असून नियमाप्रमाणे डेव्हलपमेंट करार होऊन विकसकाकडून प्रिमियम येणे बाकी आहे. त्यामुळे नाहरकत पत्र देणे राहिले आहे. या सोसायटी आणि विकसक यांच्यातील अंतर्गत गोष्टी आहेत. त्यामुळे आमच्याकडून कोणतेही काम रखडले नाही.

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply