Vijay Wadettiwar News : 'अवयव विक्रीला काढले तरी लाज नाही...' विजय वडेट्टीवार संतापले; शेतकऱ्यांच्या प्रश्नावरुन सरकारला घेरलं

Vijay Wadettiwar News : हिवाळी अधिवेशनाच्या  दुसऱ्या आठवड्याला आजपासून सुरूवात होत आहे. नागपूरमध्ये होत असलेल्या या अधिवेशनात आज शेतकरी प्रश्नांवर चर्चा झाली. दुष्काळ, पाणी टंचाई, अवकाळी पाऊस, गारपीट, पिकविमा कंपन्यांची मुजोरी, हमीभावाचे गाजर, निर्यात बंदीचा फटका यावरुन विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी आक्रमक भूमिका घेत सरकारवर हल्लाबोल केला.

काय म्हणाले विजय वडेट्टीवार?

"सरकारने ट्रीगर एक मध्ये 194 तालुके असताना केवळ 40 तालुकेच दुष्काळी घोषीत केले. यावेळी सरकारने केवळ एमआर-सॅक व महा-मदत ही संगणक प्रणालीचा आधार घेतला. पण शेतकऱ्यांच्या अश्रू पाहिले नाहीत. शेतकऱ्यांनी आपले अवयव विकण्यासाठी काढले आहेत. तरी सरकारला लाज वाटत नाही..." अशी टीका  विजय वडेट्टीवार यांनी केली.

Nashik News : लिलाव पुन्हा सुरु झाले पण कांद्याचे भाव घसरले, बळीराजा पुन्हा चिंतेत

तसेच "शेतकऱ्यांना तुटपुंजी मदत अपेक्षित नाही. सरसकट हेक्टरी किमान ५० हजार रूपये आणि बागायतीखालील क्षेत्राकरिता प्रति हेक्टरी किमान १ लाख रूपये तात्काळ मदत देण्याची आवश्यकता आहे. 24 ऑगस्टला 2023 आम्ही दुष्काळ जाहीर करण्यासंदर्भात सरकारला पत्र दिले. पण सरकारला जाग आली नाही. कर्नाटकच्या धर्तीवर सरकारने अर्ली ड्रॉट जाहीर केला असता तर  शेतकऱ्यांचे भले  झाले असते..." असे वडेट्टीवार म्हणाले.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply