Tomato Rate Hike: कांद्यानंतर आता टोमॅटोही रडवणार, टोमॅटोच्या दरात दुपटीने वाढ !

Vashi Market : लांबलेला पावसाळा आणि वाढती उष्णता यांचा परिणाम भाज्यांवर दिसत असून बाजारात भाज्यांचे दर वाढलेले आहेत. कांदा ४० रुपयांच्या पार चालला आहे तर बटाट्याच्या किमतीतही वाढ होताना दिसत आहे.

यात भरासभर म्हणून टोमॅटोच्याही किंमती दुपटीने वाढल्या आहेत. टोमॅटो दर वाढल्याने शेतकऱ्याऱ्यांना चांगला भाव मिळत असला तरी सर्व सामान्यांच्या खिशाला मात्र मोठं भगदाड पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे कांद्यानंतर आता टोमॅटोही सर्वसामान्यांना रडवणार असेच चित्र दिसत आहे.
देशात सध्या अनेक ठिकाणी उष्णतेची लाट दिसून येत आहे. याचा परिणाम टोमॅटो पिकावर जास्त प्रमाणात होत असून उष्णतेमुळे टोमॅटो लवकर पिकत आहेत. टोमॅटो लवकर पिकून सडत असल्याने बाजारात खराब टोमॅटो फेकून देण्याची वेळ येत आहे. तर दुसरीकडे मुळातच उत्पादन कमी झाल्याने टोमॅटोच्या दरात मोठ्याप्रमाणात वाढ झालेली दिसून येत आहे

Cabinet Expansion : राज्य मंत्रिमंडळ विस्ताराची तारीख ठरली? प्रतीक्षेत असलेल्या नेत्यांची मंत्रीपदी लागणार वर्णी?

में महिन्यात टोमॅटो घाऊक बाजारात २० ते २५ रुपये प्रती किलोने विकले होते. वाशीतील एपीएमसी बाजारात शुक्रवारी (१४ जून) १९६१ क्विंटल टोमॅटोची आवक झाली त्यावेळी घाऊक बाजारात टोमॅटोचे दर ३० ते ४० रुपये प्रती किलो झाल्याचे पहायला मिळाले. परंतु, आता हे दर वाढून सरासरी ४० ते ५० रुपये प्रती किलो होण्याची शक्यता व्यापारी वर्तवत आहेत. टोमॅटोच्या भाव वाढीचा परिणाम केवळ मुंबई महाराष्ट्रा पुरताच दिसत नसून दक्षिणेकडील कर्नाटक, आंध्रप्रदेश, केरळ, तामिळनाडू या भागांत टोमॅटोचे दर वाढलेले आहेत.

कर्नाटक राज्यात टोमॅटोचे दर ६० रुपयांच्या पार पोहोचले आहेत. मात्र, उत्तर भारतात याचा इतका परिणाम दिसून येत नसल्याचे व्यापाऱ्याऱ्यांनी सांगितले आहे. उष्णतेच्या प्रभावाखाली असणाऱ्या उत्तरेकडील राज्यामध्ये पिकणारा टोमॅटो झाडांवर लवकर पिकत असल्याने त्याची काढणी देखील लवकर करण्यात येत आहे. त्यामुळे बाजार पेठेत लवकर पुरवठा केल्याने तिथे टोमॅटोच्या दरांमध्ये तितकासा परिणाम पहायला मिळत नसल्याचे व्यापारी सांगत आहेत.
"वाढत्या उष्णतेचा परिणाम टोमॅटोवर मोठ्या प्रमाणात पहायला मिळतो आहे. उष्णतेमुळे लवकर पिंकून बराचसा टोमॅटो खराब झाल्याने फेकून द्यावा लागत आहे. तसेच जुलै ते ऑक्टोबर या महिन्यात टोमॅटोचे दर हे वाढलेलेच असतात. पावसाळा सुरू झाल्यावर टोमॅटो पिकाचे सुद्धा मोठे नुकसान होत असते. त्यामुळे देखील टोमॅटोचे पीक कमी होऊन दर वाढत असतात. टोमॅटोचे नवीन पीक येईपर्यंत ग्राहकांना भाववाढ सोसावी लागेल अशी परिस्थिती सध्या दिसत आहे."

"सर्वच भाज्याचे दर वाढले आहेत. टोमॅटो ही भाजी जवळपास जेवणातल्या प्रत्येक प्रकारात वापरली जाते. त्यामुळे दर वाढल्याने टोमॅटोच्या बाबतीतही काटकसर करावी लागणार आहे. वाढत्या महागाईने आधीच घर खर्च भागत नसताना भाज्यांच्या किंमती वाढल्याने घराचे वजेट पुरते कोलमडून पडले आहे."

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply