Vasant Chavan Death : नांदेडचे खासदार वसंत चव्हाण यांचं दीर्घ आजाराने निधन, हैदराबादमधील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास

Vasant Chavan Died : नांदेडचे खासदार आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते वसंत चव्हाण यांचं दीर्घ आजाराने निधन झालं आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर हैदराबाद येथील किम्स रुग्णालयात उपचार सुरू होते. आज पहाटे चार वाजता त्यांची प्राणज्योत मालवली.

वसंत चव्हाण यांची प्रकृती गेल्या काही दिवसांपासून खालावली होती. त्यामुळे त्यांना नांदेड येथील रुग्णालयात हलवण्यात आले. परंतु, तेथील डॉक्टरांनी त्यांना हैदराबाद येथे जाण्यास सांगितले. त्यामुळे एअर अॅब्युलन्सने त्यांना हैदराबाद येथील किम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र तिथे त्यांची आजाराशी सुरू असलेली झुंज संपली आणि काँग्रेसचा एक निष्ठावान नेता हरपला.

मागील दोन दशकांत राज्य विधिमंडळाच्या दोन्हीही सभागृहांत प्रतिनिधित्व केल्यानंतर काँग्रेसचे वसंतराव चव्हाण हे वयाच्या सत्तरीत २०२४ मध्ये लोकसभेत निवडून आले होते. १९५७ पासून नांदेड जिल्ह्यात बहुतांश खासदार पहिल्याच प्रयत्नात लोकसभेवर निवडून गेले, त्या मालिकेत सरपंचपदापासून राजकीय कारकीर्द सुरू करणार्‍या वसंतरावांचे नावही घेतले जाते.

Pune : पोलीस अधिकाऱ्यावर कोयत्याने वार करून पसार झालेले सराइत गजाआड, सोलापूर परिसरात गुन्हे शाखेची कारवाई

नांदेड जिल्ह्यातील काही राजकीय घराणी राजकीयदृष्ट्या बाद झाल्याचे दिसत असताना ज्या घराण्यांचा दबदबा अद्यापही कायम आहे, अशा नायगावच्या अमृतराव चव्हाण यांच्या मोठ्या घराण्यातील वसंतराव हे एक प्रतिनिधी. त्यांचे वडील बळवंतराव जिल्ह्याच्या राजकारणात दीर्घकाळ कृतिशील राहिले. आमदारकीचा त्यांचा वारसा वसंतरावांनी पुढे चालविला. अशोक चव्हाण यांच्या पक्षांतरामुळे यंदा ध्यानीमनी नसताना त्यांच्यावर अचानक लोकसभा निवडणूक लढविण्याचा प्रसंग आला आणि पहिल्या प्रयत्नातच ते यशस्वी ठरले.

सरपंच ते खासदार व्हाया आमदार

वसंत चव्हाण १९७८ साली आपल्या नायगाव या गावचे पहिल्यांदा सरपंच झाले. नंतर त्यांना जिल्हा परिषदेवर काम करण्याची संधी मिळाली. २००२ साली ते जिल्हा परिषदेवर निवडून आले होते, पण नंतर लगेचच त्यांना राज्य विधान परिषदेवर संधी मिळाली. तेथून पुढे तब्बल १६ वर्षे ते विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात कार्यरत होते. नायगाव या गावात एज्युकेशन सोसायटी या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी मोठा शैक्षणिक विस्तार केला आहे. जिल्ह्यात २००९ साली नायगाव विधानसभा मतदारसंघाची नव्याने निर्मिती झाल्यानंतर या मतदारसंघाचे पहिले आमदार वसंतरावच ठरले. नांदेडमध्ये अशोक चव्हाण-भास्करराव खतगावकर या नेत्यांविना काँग्रेस जिंकू शकते, हे त्यांनी मोठ्या आश्वासकतेने सिद्ध केले. नांदेडमधील काँग्रेसचे वर्चस्व कायम राखले.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply