Vasai News: सेल्फी जीवावर बेतली! समुद्रात बुडून बाप-लेकाचा मृत्यू , वसई समुद्रकिनाऱ्यावरील घटना

Vasai Beach : वसई समुद्रामध्ये बुडून बाप-लेकाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सेल्फीने या दोघांचा जीव घेतला आहे. वसई पोलिसांकडून (Vasai Police) दोघांचा शोध सुरु आहे. या घटनेमुळे वसई परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

वसई किल्ल्यानजीकच्या समुद्रकिनार्‍यावर सेल्फी काढण्याच्या प्रयत्नात मुलगा पाण्यात पडला. त्याला वाचवण्यासाठी वडिलांनी समुद्रात उडी मारली. मात्र दोघांचाही पाण्यामध्ये बुडून मृत्यू झाला. ही घटना रविवारी संध्याकाळी घडली. वसई पोलीस बुडालेल्या बाप-लेकाचा शोध घेत आहेत. शैलेंद्र मोरे (४२) आणि देवेंद्र (१४ वर्षे) अशी या मृत्यू झालेल्या बाप-लेकाची नावं आहेत.

वसई पश्चिमेच्या ओम नगर येथे शैलेंद्र मोरे आपल्या कुटुंबीयांसोबत राहत होते. रविवारी त्यांनी घरी स्वामी समर्थांचा पाठ आयोजित केला होता. पूजा संपल्यावर निर्माल्य समुद्रात टाकण्यासाठी शैलेंद्र मोरे हे आपला मुलगा देवेंद्रला घेऊन दुचाकीने वसई किल्ल्याजवळील समुद्र किनाऱ्यावर गेले होते. त्याच दरम्यान ही घटना घडली.

Cm Eknath Shinde : राज्यातील दुष्काळग्रस्त भागांना पाणी पुरविणाऱ्या प्रकल्पांना केंद्र सरकारने मदत करावी: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

निर्माल्य टाकल्यानंतर शैलेंद्र यांचा मुलगा देवेंद्रे जेटीवरून सेल्फी काढत होता. त्याचवेळी त्याचा तोल जाऊन तो समुद्रात पडला. मुलगा समुद्रात पडल्याचे पाहून शैलेंद्र यांनी त्याला वाचविण्यासाठी धावत जाऊन समुद्रात उडी मारली. मात्र पोहता येत नसल्याने दोघेही समुद्रात बुडाले. एका प्रत्यक्षदर्शीने हा प्रकार पाहिला आणि पोलिसांना सांगितले. मात्र ते कोण होते याची माहिती मिळत नव्हती. अखेर त्यांचाबद्दल माहिती मिळाली. या दोघांचा शोध पोलिसांकडून सुरु आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply