Vande Bharat Train: नागपूरहून निघालेल्या वंदे भारत एक्सप्रेसवर दगडफेक, चार दिवसांपूर्वीच ट्रेन सेवा सुरु

Vande Bharat Train: वंदे भारत एक्सप्रेसवर दगडफेक झाल्याची घटना समोर आली आहे. छत्तीसगडमध्ये बुधवारी संध्याकाळी कुणीतरी ट्रेनवर दगडफेक केली. यात ट्रेनच्या खिडकीच्या काचा फुटल्या आहेत. सुदैवाने यात प्रवाशांना कोणतीही दुखापती झाली नाही.

घटनेची माहिती मिळताच आरपीएफ जवान घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी तपास सुरू केला. चार दिवसांपूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागपूर-बिलासपूर वंदे भारत ट्रेनला हिरवा झेंडा दाखवला होता.

मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी संध्याकाळी दक्षिण पूर्व मध्य रेल्वे (SECR) च्या रायपूर विभागांतर्गत दुर्ग आणि भिलाई स्थानकांदरम्यान ट्रेन आली तेव्हा कोणीतरी दगडफेक केली. दगड ई-1 कोचच्या खिडकीवर लागल्याने थोडंफार नुकसान झालं आहे. वंदे भारत सेमी हायस्पीड ट्रेन नागपूरहून बिलासपूरकडे येत होती.

रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले की, रेल्वे सुरक्षा दलाने या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. काही समाजकंटकांनी ही कृती केल्याचं प्रथमदर्शनी दिसत आहे. आरपीएफ अधिक तपास करत आहे. 11 डिसेंबर रोजी पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते नागपुरात त्याचे लोकार्पण करण्यात आले.

ट्रेनचं भाडं किती?

IRCTC ने बिलासपूर ते नागपूर चेअर कारचे भाडे AC-II साठी 1,077 रुपये, एक्झिक्युटिव्ह क्लाससाठी 2,045 रुपये निश्चित केले आहे. ट्रेनमध्ये 16 डबे आहेत ज्यात 14 चेअर कार आणि 2 एक्झिक्युटिव्ह चेअर कार आहेत. एकूण आसन क्षमता 1128 आहे.

 



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply