Maharashtra lok sabha News : नाशिक, दिंडोरीत महायुती, महाविकास आघाडीचं टेन्शन वाढलं, 'वंचित' लोकसभा लढवणार

Maharashtra lok sabha News : महायुती, महाविकास आघाडीचा काही जागांवरून जागावाटपाचा घोडं अडलं आहे. महाविकास आघाडीतर्फे ठाकरे गटाने नाशिकमधून राजाभाऊ वाजे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. तर महायुतीचा नाशिकमध्ये अद्याप उमेदवार ठरलेला नाही. या मतदारसंघात महायुतीकडून छगन भुजबळ यांना उमेदवारी मिळणार असल्याची चर्चा आहे. याचदरम्यान, वंचित बहुजन आघाडीने नाशिक, दिंडोरी लोकसभा लढविण्याचे संकेत दिले आहेत. यामुळे या दोन्ही लोकसभा मतदारसंघात कोणाला उमेदवारी मिळते, याकडे साऱ्यांचं लक्ष लागलं आहे.

वंचित बहुजन आघाडीने नाशिक आणि दिंडोरी लोकसभेत उमेदवार जाहीर केल्यास महाविकास आघाडी आणि महायुतीचं टेन्शन वाढणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे. नाशिक शहर अध्यक्ष अविनाश शिंदे यांनी नाशिक आणि दिंडोरी लोकसभा लढविण्यासाठी प्रकाश आंबेडकरांकडून दुजोरा मिळाल्याचा दावा त्यांनी केला आहे.

Rohit Pawar : पिक्चर अभी बाकी है; अनेक आमदार साहेबांच्या संपर्कात... रोहित पवार यांचा मोठा दावा

वंचित बहुजन आघाडीला २०१९ लोकसभेतील निवडणुकीत एक लाखांहून अधिक मते मिळाली होती. तर दिंडोरी लोकसभेत ५८ हजारांहून अधिक मते मिळाली होती.

'नाशिक जिल्हाध्यक्ष पवन पवार आणि मी वंचित बहुजन आघाडीकडून नाशिक लोकसभा लढविण्यासाठी इच्छुक आहे. आम्ही पक्षाच्या निर्णयाची वाट पाहत आहोत, असे अविनाश शिंदे यांनी सांगितले.

तर दिंडोरी लोकभा निवडणुकीत राजेंद्र बदडे यांनी निवडणूक लढविण्याची इच्छा दर्शवली आहे. 'वंचित बहुजन आघाडीला मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळत आहे. आम्हाला वंचितच्या बॅनरखाली मोठ्या प्रमाणात मते मिळू शकतात, असेही शिंदे यांनी सांगितले.

अविनाश शिंदे यांनी पुढे म्हटलं की, वंचित बहुजन आघाडीने राज्यातील महत्वाच्या प्रश्नावर लक्ष केंद्रीत केलं आहे. यामध्ये संविधान आणि लोकशाही वाचवणे, शेतकऱ्यांचे प्रश्न, नाशिकचा औद्योगिक विकास, मराठा आरक्षण या मुद्द्यांचा सामावेश आहे'.

दरम्यान, वंचित बहुजन आघाडीने आतापर्यंत ९ उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. वंचितचे अध्यक्ष स्वत: अकोल्यातून लोकसभा निवडणूक लढवणार आहे. तर वंचितने राज्यातील काही जागांवर काँग्रेसला पाठिंबा जाहीर केला आहे. तर सांगलीत ओबीसी नेते प्रकाश शेंडेगे यांना पाठिंबा जाहीर केला आहे



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply