Vaishnavi Hagawane : 'हे प्रकरण साधं नाही, जखमा पाहून हत्याच..' हगवणे प्रकरणात ट्वीस्ट, राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याला वेगळाच संशय

Vaishnavi Hagawane : वैष्णवी हगवणे या प्रकरणामुळे सध्या राज्यातील वातावरण तापलंय. सासरच्या मंडळींकडून होणारा छळ आणि हुंडाबळीमुळे वैष्णवीनं टोकाचं पाऊल उचललं. या धक्कादायक घटनेनंतर अनेक नेत्यांनी तीव्र शब्दात नाराजी आणि संताप व्यक्त केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आरोपींविरोधात कठोर कारवाई केली जाईल, असे प्रसारमाध्यमांसमोर सांगितले. यावर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी तीव्र शब्दांत प्रतिक्रिया दिली आहे. तसेच संशय देशील व्यक्त केला आहे.

आमदार रोहित पवार यांनी हगवणे प्रकरणात संशय व्यक्त केला आहे. त्यांनी ट्वीट करत हा संशय व्यक्त केला आहे, 'वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरण हे खरंतर साधं दिसत नाही. तिच्या अंगावरील जखमा या खूप भयानक आहेत. या जखमा पाहून ही आत्महत्या नाही तर, हत्या असल्याचा संशय येत आहे, असं रोहित पवार म्हणाले.

Vaishnavi Hagawane: हगवणे मृत्यूप्रकरणात मुख्यमंत्र्यांचा आयुक्तांना फोन, दोषींवर कारवाई करण्याचे आदेश अन् बाळाचा ताबा..

हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर तिचा सासरा आणि दीर फरार झाले आहेत. त्या दोघांनी खरंच पोलिसांना गुंगारा दिला आहे की, पोलिसांच्या आशिवार्दाने गायब झाले आहेत, हे कळून येत नाही आहे, पण पैशांसाठी माणासांचा जीव घेणाऱ्या अशा लालची, निर्दयी आरोपींना कठोर शिक्षा झालीच पाहिजे, यासाठी फरार आरोपींना तातडीने तपास करून अटक झाली पाहिजे, ही विनंती, असं त्यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

वडेट्टीवारांची संतप्त प्रतिक्रिया

हगवणे मृत्यूप्रकरणात काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे, प्रसारमाध्यमांशी बोलताना वडेट्टीवार म्हणाले, 'महाराष्ट्रात हुंडाबळी हा प्रकार अजूनही जिवंत आहे. त्यामुळे अधिक कडक धोरण करण्याची गरज आहे. अशा नालायक लोकांना कडक शिक्षा झाली पाहिजे अशी आमची मागणी आहे', असं वडेट्टीवार म्हणाले.

 

 

 

 

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply