Beed : वैद्यनाथ साखर कारखाना निवडणुकीत धनंजय मुंडेंचा मोठा निर्णय, बहिण-भावातील संघर्ष टाळण्याचा प्रयत्न?

Beed News : बीडच्या परळी येथील वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत मुंडे बहिण-भावांनी संघर्ष टाळण्याचा प्रयत्न केल्याचे चित्र दिसून येत आहे. 21 संचालकांच्या निवडीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी एकूण 50 जणांनी अर्ज दाखल केले आहेत. विशेष म्हणजे साखर कारखाना निवडणुकीसाठी धनंजय मुंडे यांनी अर्ज भरलेला नाही.

भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या पाठोपाठ त्यांच्या भगिनी खासदार प्रीतम मुंडे, अॅड. यशश्री मुंडे आणि त्यांच्या मातोश्री प्रज्ञा गोपीनाथराव मुंडे यांनी सुद्धा वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार धनंजय मुंडे यांनी मात्र आपला उमेदवारी अर्ज दाखल केलेला नाही.

वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याच्या संचालकपदाच्या 21 जागेच्या निवडणुकीसाठी 16 मे रोजी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत एकूण 50 जणांनी आपले नामनिर्देशन पत्र निवडणूक निर्णय अधिकारी सहाय्यक निबंधक कार्यालय परळी यांच्या कार्यालयात दाखल केले आहेत. यामध्ये आमदार धनंजय मुंडे यांचे कट्टर समर्थक वाल्मीक कराड, अजय मुंडे आणि इतरांनी अर्ज दाखल केले.

धनंजय मुंडे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला नाही. तर पंकजा मुंडे यांनी स्वतःसह आई आणि दोन्ही बहिणींचे देखील अर्ज दाखल केले आहेत. दरम्यान यामुळे उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या दिवशीच याचे चित्र स्पष्ट होणार आहे. पण धनंजय मुंडे यांनी उमेदवारी अर्ज दाखल न केल्यामुळे मुंडे बहिण-भावातील संघर्ष टाळण्याचा प्रयत्न करण्यात आला असल्याचे बोलले जात आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply