Uttar Pradesh Crime News : तुम्ही बनावट औषधे खाताय? फेक मेडिसिन गँगचा पर्दाफाश, कारखान्यावर छापा, कोट्यवधींची औषधे जप्त

 

  Uttar Pradesh Crime News : गाझियाबादमध्ये  बनावट औषधांचा कारखाना पकडला गेला आहे. औषध विभागानं घटनास्थळावरून 1 कोटी 10 लाख रुपयांची बनावट औषधे जप्त केली आहेत. ही बनावट औषधे नामांकित कंपन्यांच्या नावानं पॅकिंग करून विकली जात होती. गाझियाबादच्या राजेंद्र नगर आणि भोपुरा भागात ही कारवाई झाली आहे. याप्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. कारखाना सील करून तपास सुरू करण्यात आला आहे. 

दिल्लीजवळील गाझियाबाद येथील एका कारखान्यावर टाकलेल्या छाप्यात धक्कादायक सत्य समोर आलं आहे. येथे या एलईडी बल्ब कारखान्यात उच्च रक्तदाब, मधुमेह आणि अँटासिडची बनावट औषधे  तयार करून बाजारात विकली जात होती. दिल्ली पोलिसांच्या 'क्राइम ब्रँच'ने या कारखाना आणि गोदामातून 1 कोटी 10 लाख रुपयांची बनावट औषधे जप्त केली आहेत.

   

    Kashmir : कलम 370 हटवल्यानंतर PM मोदी आज पहिल्यांदाच काश्मीरमध्ये; श्रीनगरमध्ये कडक सुरक्षा बंदोबस्त March

बनावट औषधांच्या कारखान्यावर छापा या कारखान्यात ब्रँडेड औषधांची नक्कल करून बनावट औषधे बनवली जात असल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे. मोठी बाब म्हणजे येथे तयार होणारी बनावट औषधे हैदराबादपर्यंत पुरवली जात  होती. या कारखान्यात नामांकित कंपन्यांची बनावट औषधे मोठ्या प्रमाणात तयार होत होती. औषध विभागाच्या पथकाने लाखो रुपयांची बनावट औषधे बनवणारी उपकरणे, तसंच बनावट औषधं बनवण्यासाठी मोठ्या प्रमाणात कच्चा माल जप्त केला आहे.

गाझियाबादमधील औषध विभागाला एका कारखान्यात बनावट औषधे तयार होत असल्याची माहिती मिळाली होती, त्यानंतर 4 मार्चपासून मोठ्या संयुक्त कारवाईचा भाग म्हणून छापा टाकण्यात आला. गाझियाबाद ड्रग्ज विभाग, दिल्ली गुन्हे शाखा आणि स्थानिक पोलिसांच्या मदतीने ही कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये गॅस, शुगर, बीपी यांसारख्या आजारांवर वापरल्या जाणाऱ्या नामांकित कंपन्यांच्या बनावट औषधांचा साठा जप्त करण्यात आला आहे.

बनावट औषधांचा साठा जप्त पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विजय चौहान नावाचा व्यक्ती हा कारखाना चालवत होता, पोलिसांनी त्याला अटक केली आहे. औषध विभाग आणि पोलिसांच्या डोळ्यात धूळफेक करून गेल्या एक वर्षापासून बनावट औषधे बनविण्याचा कारखाना सुरू (Fake Medicines Business Busted) होता. आरोपींनी तळमजल्यावर एलईडी बल्ब दुरुस्तीचा कारखाना उभारला होता, तर वरच्या मजल्यावर बनावट औषधे तयार करण्याचं काम मोठ्या प्रमाणात सुरू होतं.

या छाप्यात लाखो रुपयांचा कच्चा माल, मशीन आणि बनावट औषधे जप्त करण्यात आली आहेत. तपास पथकाने 14 नमुने तपासणीसाठी पाठवले आहेत. औषध विभागाच्या पथकाने साहिबााबाद पोलिस ठाण्यात बनावट औषधे बनवणे, विक्री करणे आणि फसवणूक या कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. ड्रग्ज इन्स्पेक्टर आशुतोष मिश्रा यांनी 'आज तक'ला दिलेल्या माहितीनुसीर, साहिबाबाद परिसरात बनावट औषधे तयार होत असल्याची माहिती मिळाली होती. बनावट औषधे बनविणाऱ्यांवर पथक नजर ठेवून होते. विभागीय अधिकाऱ्यांनी गुन्हे शाखा आणि साहिबाबाद पोलीस ठाण्याच्या पथकासह सर्वेक्षण केलं. बनावट औषधे बनवणाऱ्या कारखान्यातून सन फार्मा, डॉ. रेड्डीज लॅब, ग्लेनमार्क या प्रसिद्ध कंपन्यांची बनावट औषधे जप्त करण्यात आली आहेत.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply