USA ने इतिहास रचला, पहिल्यांदाच टी -२० वर्ल्डकप स्पर्धेच्या सुपर ८ मध्ये प्रवेश; पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर

USA Create History  : टी-२० विश्वचषकात अमेरिकेची आतापर्यंतची कामगिरी सर्वांनाच चकित करणार ठरली आहे. पहिल्यांदाच टी-२० विश्वचषकाचा भाग असलेल्या यूएसए संघाने सुपर ८ मध्ये स्थान मिळवलं आहे. हा पराक्रम करत अमेरिकेने इतिहास रचला आहे.

आज फ्लोरिडा येथे अमेरिका आणि आयर्लंड यांच्यातील सामना पावसामुळे रद्द झाला. पावसामुळे सामना सुरू होण्यासाठी सुमारे साडेतीन तास प्रतीक्षा करावी लागली. मात्र खराब वातावरणामुळे नाणेफेक न होता सामना रद्द करण्यात आला.
अशातच दोन्ही संघांना प्रत्येकी एक गुण मिळाला आणि यूएसएने पाच गुणांसह सुपर-8 मध्ये प्रवेश केला. तर पाकिस्तानचा संघ सुपर-८ च्या शर्यतीतून बाहेर पडला आहे.

T20 World Cup 2024: अफगाणिस्तानचा PNG वर दणदणीत विजय अन् न्यूझीलंड थेट स्पर्धेतूनच बाहेर


दरम्यान, टी-२० विश्वचषकात अमेरिकेच्या संघाने पाकिस्तानचा सुपर ओव्हरमध्ये पराभव केला होता. याआधी यूएसए संघाने कॅनडाविरुद्धही विजय मिळवला होता.

यूएसए संघासाठी आतापर्यंत आरोन जोन्स, सौरभ नेत्रावळकर, अली खान आणि नितीश कुमार यांनी चमकदार कामगिरी केली आहे. आरोन जोन्सने कॅनडाविरुद्ध जबरदस्त खेळी केली होती. या टी-२० विश्वचषकात सर्वाधिक धावा करणारा आरोन जोन्स दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्याने तीन सामन्यांत 141 धावा केल्या आहेत.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply