Unauthorized Bar in Pune : पुण्यातील पब संस्कृतीवर बुलडोझर; पालिकेची सलग दुसऱ्या दिवशी धडक कारवाई

Unauthorized Bar in Pune : पुणे महापालिकेने सलग दुसऱ्या दिवशी अतिक्रमण विभागाने कारवाई सुरु केली आहे. पुणे शहरातील दुसऱ्या दिवशी पुणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने कारवाई सुरु केली आहे. या विभागाने शहरातील बार आणि पबमधील अनधिकृत बांधकामांवर पालिकेचा हातोडा चालवला आहे.

पुणे शहरासहित पाषाण भागातील एफएमएल बारच्या अनधिकृत बांधकामावर हातोडा चालवण्यास सुरुवात केली आहे. पुणे विभागाच्या अतिक्रमण विभागाने काल दिवसभरात २६ हॉटेल, रेस्टॉरंटवर ही कारवाई केली.
 

पालिकेने दिवसभरात एकूण ३७ हजार चौरस फूट अनधिकृत बांधकाम तोडण्यात आले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानंतर पुणे महापालिकेने ही धडक कारवाई केल्याची माहिती मिळत आहे. पुण्याच्या बाणेरमध्येही द कॉर्नर लाऊंज, मुरकुटे गार्डनजवळील पॅनकार्ड क्लब रोड परिसरात ही कारवाई करण्यात आली आहे.

अनधिकृत बांधकामाविरोधात पालिका आक्रमक

पुणे महानगरपालिकेने अनधिकृत बांधकामाविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. पुण्यातील हॉटेल पब बारवर देखील कारवाई केली जात आहे. तसेच एस्कोबार या हॉटेल कारवाई करण्यात येणार आहे. पालिकेने एस्कोबार हॉटेलला देखील नोटीस बजावण्यात आली आहे. त्यानंतरही त्यांनी काही न केल्यास अतिक्रमण विभागाकडून कारवाई करण्यात येणार आहे.

 
 

 



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply