Ulhasnagar : मावळनंतर उल्हासनगरचा पूल कोसळला; ५०० जणांचा संपर्क तुटला, पूल खचला पण..

Ulhasnagar : मावळमधील कुंडमळातील पूल कोसळल्याची घटना ताजी असतानाच उल्हासनगरमध्येही पूल कोसळल्याचं समोर आलं. उल्हासनगरच्या कॅम्प ५ मधील गणेश नगर भागात नाल्यावरील पूल कोसळला असून, याचा सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आला आहे. पूल कोसळल्यामुळे ५०० घरांच्या येण्या जाण्याचा मार्ग बंद झाला आहे. सुदैवाने कोणतीही दुर्घटना घडली नाही. मात्र, पुलाचा वापर करणाऱ्या सुमारे ५०० पेक्षा अधिक घरांचा संपर्क मुख्य रस्त्याशी तुटला आहे.

उल्हासनगरमध्ये गेल्या काही दिवसांपासून संततधार पावसाला सुरूवात झाली आहे. नाले, नद्या दुथडी भरून वाहत आहेत. उल्हासनगरच्या कॅम्प ५ मधील गणेश नगर भागातही पावसाने काही उसंत घेतलेली नाही. दरम्यान, सतत पडणाऱ्या पावसामुळे गणेशनगर भागातील पूल कोसळला आहे.

सुदैवाने कुणीही त्या पुलावरून जात नव्हतं. यामुळे जिवितहानी टळली. मात्र, पूल कोसळल्याने ५०० हूनअधिक घरांचा येण्या-जाण्याचा रस्ता बंद झाला आहे. या पुलाची मागील काही वर्षांपासून दुरावस्था झाली होती. मात्र उल्हासनगर महापालिकेनं त्याकडे दुर्लक्ष केल्यानं रविवारी सायंकाळी ८ वाजताच्या सुमारास हा पूल कोसळला.

ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. फुटेजमध्ये पुलाचा काही भाग क्षणात कोसळत असल्याचं दिसत आहे. स्थानिक नागरिकांनी या घटनेनंतर महापालिकेविरोधात संताप व्यक्त केला असून, हलगर्जीपणामुळे ही दुर्घटना घडल्याचा आरोप केला जात आहे.

या पुलाची अवस्था गेल्या काही महिन्यांपासून अत्यंत खराब झाली होती. पुलाचा काही भाग जीर्ण झाला होता. अनेक वेळा तक्रारी करूनही उल्हासनगर महानगरपालिकेकडून दुरुस्ती किंवा पुनर्बांधणीसाठी कोणतीच ठोस पावले उचलण्यात आली नव्हती, असे स्थानिकांचे म्हणणे आहे.

 

 

 

 

 

 

 

 



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *