Ujjain Temple Fire : उज्जैनच्या महाकाल मंदिराच्या गर्भगृहात भस्म आरतीदरम्यान लागली आग, पुजाऱ्यासह १३ जण जखमी

Ujjain Temple Fire : मध्य प्रदेशातील उज्जैन येथे असलेल्या महाकाल मंदिराच्या गर्भगृहात आज भस्म आरतीदरम्यान आग लागली. या आगीच्या घटनेच पुजाऱ्यासह १३ जण जखमी झाले आहेत. आरतीच्या वेळी गुलाल उधळल्यामुळे आग लागल्याचे सांगण्यात येत आहे. आग वेळीच आटोक्यात आणण्यात आली. यामुळे मोठा अनर्थ टळला. मात्र, या घटनेदरम्यान गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. या घटनेची माहिती देताना उज्जैनचे जिल्हाधिकारी नीरज कुमार सिंह म्हणाले की, आग आटोक्यात आणण्यात आली आहे. या घटनेत लोक किरकोळ भाजले. कोणीही गंभीर जखमी नाही.

Pune : सासरच्या जाचाला कंटाळून विवाहितेने संपवलं जीवन; पुण्यातील वाघोली परिसरातील घटना

गर्भगृहाच्या भिंती आणि छतावर चांदीचा लेप आहे. होळीला बाबा महाकालला गुलाल अर्पण करतात आणि पुजारीही एकमेकांना रंग लावतात. हे रंग गर्भगृहाच्या भिंतींना खराब होऊ नयेत यासाठी यंदा शिवलिंगावर प्लास्टिकचे फ्लेक्स लावण्यात आले असून गर्भगृहात एकमेकांवर रंगांचा वर्षाव होत असताना आरतीच्या ताटात जळणाऱ्या कापूरवर गुलाल उधळला गेला, त्यामुळे कापूर आगीने पेट घेतला मात्र, काही वेळातच आग आटोक्यात आली.

रविवारी सायंकाळपासूनच महाकालेश्वराच्या प्रांगणात होळी उत्सवाला सुरुवात झाली होती. येथे सर्वप्रथम सायंकाळच्या आरतीवेळी हजारो भाविकांनी बाबा महाकाल यांच्यासोबत गुलालाची होळी खेळली. त्यानंतर महाकाल प्रांगणात होलिका दहन करण्यात आले.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply