Barsu Refinery Project : कोकणात आज बारसू रिफायनरी प्रकल्पावरुन राजकीय धुमशान; राज अन् उद्धव ठाकरेंच्या तोफा धडाडणार

Uddhav Thackeray and Raj Thackeray Barsu Visit: कोकणात आज राजापूर तालुक्यातील नियोजित बारसू रिफायनरी प्रकल्पावरुन राजकीय धुमशान पाहायला मिळणार आहे. रिफायनरी विरोधकांची भेट घेण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज बारसूत जाणार आहेत. ठाकरे गटाने त्यासाठी जोरदार तयारी केली आहे.

कोकणातील राजापूर बारसू येथील प्रस्तावित रिफायनरी प्रकल्पाच्या सर्वेक्षणाचा मुद्दा सध्या गाजत आहे. काही ग्रामस्थांचा याला विरोध आहे. याच ग्रामस्थांची भेट घेण्याकरता उद्धव ठाकरे राजापूर बारसू येथे येणार आहेत. 

मुंबईतील (Mumbai) महाविकास आघाडीच्या वज्रमूठ सभेत उद्धव ठाकरे यांनी रत्नागिरी दौऱ्याची घोषणा केली होती. याच दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री नारायण राणे देखील मोर्चा काढणार आहे. त्यामुळे राजापूर येथे आज रिफायनरी समर्थक आणि विरोधक हे आमने-सामने येण्याची शक्यता आहे. त्यामुळे येथील वातावरण चांगलेच तापणार आहे.

रत्नागिरीत आज राज ठाकरेंची तोफ धडाडणार

आज मनसेप्रमुख राज ठाकरे  यांची देखील रत्नागिरीमध्ये जाहीर सभा होणार आहे. राज ठाकरे यांची रत्नागिरीमधील ही पहिलीच सभा आहे. त्यामुळे आजच्या सभेत राज ठाकरे काय बोलणार याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे. या सभेच्या निमित्तानं कोकणात मसनेकडून जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यात येणार आहे. 

राज ठाकरेंच्या आजच्या या सभेमुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. सभेची जय्यत तयारी करण्यात आली आहे. सध्या राज्यातील राजकीय परिस्थिती पहाता या सभेतून राज ठाकरे कोणावर निशाणा साधणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.

नारायण राणे काढणार महामोर्चा

दुसरीकडे बारसू रिफायनरी प्रकल्पाच्या समर्थनार्थ भाजप नेते आणि मंत्री नारायण राणे  हेही महामोर्चा काढणार आहेत. यात राणेंसोबत उद्योगमंत्री उदय सामंत आणि राणे यांचे दोन्ही चिरंजीव नीलेश आणि आमदार नितेश राणे सहभागी होणार आहेत. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून प्रचंड पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

काय आहे बारसू रिफायनरी प्रकल्प?

भारत सरकारला महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टीवर एक मेगा ऑइल रिफायनरी प्रकल्प उभारायचा आहे. २०१५ मध्ये, 'रत्नागिरी रिफायनरी अँड पेट्रोकेमिकल्स लिमिटेड' प्रकल्प रत्नागिरी, महाराष्ट्र येथे बांधला जाईल, अशी घोषणा करण्यात आली.यापूर्वी हा प्रकल्प रत्नागिरीतील नाणारमध्ये बांधण्यात येणार होता. मात्र शिवसेना आणि स्थानिक लोकांचा या प्रकल्पाला तीव्र विरोध होता.

पुढे महाविकास आघाडीचे सरकार आपल्यानंतर हा प्रकल्प नाणारऐवजी बारसू-सोलगावमध्ये उभारण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवला. शासनाच्या संमतीनंतर पुन्हा हा प्रकल्प होण्याची आशा निर्माण झाली होती. मात्र येथेही या प्रकल्पला स्थानिक विरोध करत आहे. येथे हा प्रकल्प होऊ नये म्हणून स्थानिक नागरिक मागील पाच दिवसांपासून आंदोलन करत आहेत.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply