Uddhav Thackeray : देवेंद्र फडणवीसांनी मणिपूरला जावं, खर्च मी करतो; उद्धव ठाकरेंचा खोचक टोला

Uddhav Thackeray : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अटकेच्या विरोधात INDIA आघाडीतील सहभागी पक्षांची आज रॅली होणार आहे. राज्यातून ठाकरे गटप्रमुख उद्धव ठाकरे, खासदार संजय राऊत, शरद पवार हे आदी नेते या रॅलीमध्ये सहभागी होणार आहेत. तत्पुर्वी उद्धव ठाकरे यांनी दिल्लीमध्ये पत्रकारांशी संवाद साधताना मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.

काय म्हणाले उद्धव ठाकरे?

देशात हुकुमशाही येऊ पाहत आहे. निवडणुकीच्या तोंडावर सोरेन, अरविंद केजरीवाल यांना अटक केली. हुकुमशाही आलेली आहे. या हुकुमशाहीचा सामना करण्यासाठी आम्ही जनतेसमोर जात आहोत. माझे दौरे सुरू आहेत. सगळ्यांच्या मनात राग आहे, त्वेष आहे. जनता फक्त निवडणुकीची वाट पाहत आहे, असे उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.

Nandurbar News : ६५ लाख ३२ हजार किमतीचा गुटखा जप्त; लोकसभेच्या पार्श्वभूमीवर पोलिसांची मोठी कार्यवाही

"मी फडणवीस यांच्या जाण्या येण्याचा खर्च करतो. त्यांनी अरुणाचल प्रदेश, मणिपूरमध्ये जावं. कश्मिरी पंडित यांना भेटून याव.तसेच एखादा प्रोड्युसर घेऊन त्यांनी मणिपूर फाईल चित्रपट काढावा," असा खोचक टोलाही उद्धव ठाकरे यांनी यावेळी लगावला.

"निवडणूक रोख्यांमुळ अनेकांचं बिंग फुटलं आहे. त्यामुळे केजरीवाल यांना आत टाकले. भाजपने अनेकांवर आरोप केले आणि नंतर पक्षात घेतले आणि त्यांच्या केसेस बंद केल्या. राष्ट्रवादीचे सगळे ठग भाजपने घेतले आहेत. आम्ही ठग मुक्त झालो आहोत," असा टोलाही उद्धव ठाकरे  यांनी यावेळी लगावला.

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply