Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंच्या हातून शिवसेना गेली; पक्षचिन्ह अन् नावही गेलं, आता पुढे काय?

Uddhav Thackeray : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाळासाहेबांची शिवसेना पक्षाला धनुष्यबाण चिन्हासह पक्षाचं नाव मिळालं आहे. निवडणूक आयोगाने हा निर्णय दिला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाच्या या निर्णयामुळे उद्धव ठाकरेंच्या हातून शिवसेना गेल्याची चर्चा सुरू झाली आहे. राज्याच्या राजकारणाला मोठं वळण या निर्णयामुळे मिळणार आहे.

दरम्यान, गेल्या अनेक दिवसांपासून पक्षचिन्ह आणि नावाचा वाद कोर्टात सुरू असून, या सर्वानमध्ये पक्षचिन्ह आणि नावाबाबत निवडणूक आयोगाने महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे.ऐन निवडणुकांच्या तोंडावर हा निकाल आल्याने ठाकरेंसाठी हा खूप मोठा धक्काअसल्याचे बोलले जात असून, आता पुढे काय असा प्रश्न उद्धव ठाकरेंसमोर उभा ठाकला आहे.

काय म्हणाले एकनाथ शिंदे

लोकशाहीमध्ये बहुमताला महत्व होते. सत्याचा विजय झाला आहे. खरी शिवसेना कोणती आहे हे आता कळले आहे. जो संघर्ष केला त्याचे चीज झाले आहे. आमचा संघर्ष काही वाया गेलेला नाही. आता आम्ही लवकरच पुढील दिशा आणि वाटचाल याकडे लक्ष देणार आहोत. आजचा निकाल आनंदाचा आहे. हा विजय बाळासाहेबांच्या विचारांचा आहे. अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आयोगाच्या निर्णयानंतर दिली आहे.

पुन्हा लढाई लढणार

तर, निवडणूक आयोगाचा आजचा निकाल म्हणजे खोक्यांचा विजय आहे. खोक्यांचा वापर कुठंपर्यंत झाला आहे हे दिसून आले आहे. निवडणूक आयोगावर माझा विश्वास नाही. जो निर्णय आला आहे तो विकत घेतलेला आहे.

खोके सरकार त्यांनी हे सगळे केले आहे. त्यांनी पाण्यासारखा पैसा ओतला आहे. आम्ही पुन्हा कायद्याची लढाई लढणार आणि नवी शिवसेना उभारणार. सगळ्या संस्था आता सरकारच्या गुलाम झाल्या आहेत. त्यामुळे आम्ही पुन्हा लढाई लढणार अशी प्रतिक्रया ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी दिली आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply