Uddhav Thackeray : 'आरएसएसला हे अपत्य मान्य आहे का?', उद्धव ठाकरेंचा भाजपवर घणाघात

मुंबईः महाविकास आघाडीची तिसरी वज्रमूठ सभा आज मुंबईत झाली. या सभेसाठी काँग्रेस, राष्ट्रवादी आणि ठाकरे गटाच्या नेत्यांची उपस्थिती होती. यावेळी उद्धव ठाकरे यांनी भाजपवर सडकून टीका केली.'अच्छे दिन'च्या नावाखाली भाजपने देशातली जनतेला फसवल्याची टीका ठाकरेंनी केली. ते म्हणाले की, २०१४ मध्ये जाहिरातीच्या बळावर भाजपने सत्तास्थापन केली. परंतु त्याच जाहिराती पुन्हा लावल्या तर हे लोक सत्तेतून बाहेर जातील.

पुढे बोलतांना उद्धव ठाकरे म्हणाले की, जम्मू काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी पुलवामा हल्ल्याबाबत गौप्यस्फोट केल्याने भाजपचा खरा चेहरा समोर आला आहे. भाजपचे लोक रामभाऊ म्हाळगी यांचे विचार विसरले का? आरएसएसला हे त्यांचं अपत्य मान्य आहे का? कारण भाजपचे लोक आमच्यावर वाट्टेल तसं आणि कशाही भाषेत टीका करीत आहेत.

उद्धव ठाकरे यांच्या भाषणातील मुद्दे

  • लोकांना फसवण्याचं काम भाजपने केलं आहे

  • 'अच्छे दिन' तर आले नाहीतच परंतु असुरक्षितता वाढली आहे

  • कोकणातील आंबा उत्पादकांना नुकसान भरपाई द्या

  • समुद्राच्या पाण्यावर प्रक्रिया करुन पिण्यायोग्य करण्याचा प्रकल्प सुरु केला होता

  • परंतु या सरकारने त्याला स्थगिती दिली

  • सत्यपाल मलिकांनी गौप्यस्फोट केला, त्यामुळे सरकारची नाचक्की झाली

  • गोरगरीबांच्या घरी ईडी लावली जात आहे

  • जाहिराती करायच्या असतील तर भाजपचं जुनं कॅम्पेन परत लावा

  • कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा?

  • स्वपक्षातल्या नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप करायचे

    आणि दुसऱ्या पक्षातले भ्रष्ट माणसं पक्षात घ्यायचे, हे भाजपचं सुरु आहे

  • आमच्याबद्दल आजकाल वाट्टेल ते बोललं जात आहे

  • हेच रामभाऊ म्हाळगींचे विचार आहेत का?

  • आरएसएसला हे अपत्य मान्य आहे का?

उद्धव ठाकरे पुढे म्हणाले, राज्यात एक विषय भडकलेला आहे बारसू. बारसूबाबत मी फक्त या सभेतच बोलणार नाही तर येत्या ६ तारखेला मी बारसूमध्ये जाऊन तिथल्या लोकांना भेटून बोलणार आहे. कसं काय तुम्ही मला अडवू शकता. बारसू काय पाकव्याप्त काश्मीर किंवा बांगलादेश नाही. मी ६ तारखेला पहिल्यांदा बारसूला जणार त्यानंतर महाडच्या सभेला जाणार, असं त्यांनी सांगितलं.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply