Udayanraje vs Shivendraraje : साताऱ्यात राडा, भूमिपूजनापूर्वी ग्रामस्थांनी साहित्य फेकून दिलं; उदयनराजे - शिवेंद्रराजेंत जुंपणार?

Udayanraje Bhosale : सातारा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नूतन इमारतीच्या भूमिपूजनापुर्वी काही ग्रामस्थांनी कार्यक्रमाच्या घटनास्थळी पाेहचून तेथील साहित्य फेकून दिले. तसेच एक कंटेनर देखील उलटा करुन टाकला. या घटनेच्या वेळीस खासदार उदयनराजे भाेसले हे देखील घटनास्थळी पाेहचले. या घटनेमुळे साता-याच्या दाेन्ही राजांमध्ये (उदयनराजे आणि शिवेंद्रराजे ) यांच्यात आगामी काळात खडाजंगी हाेण्याची चिन्ह निर्माण झालीत.

आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या उपस्थितीत आज खिंडवाडी (कणसे ढाब्या शेजारी) येथे सातारा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नुतन इमारतीचे भुमीपुजन दहा वाजता होणार आहे. त्यासाठी खिंडवाडी येथे जय्यत तयारी सुरु आहे. या कार्यक्रमानंतर आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची पत्रकार परिषद देखील होणार आहे. 

Follow us -

या कार्यक्रमापुर्वी काही ग्रामस्थांनी येथे पाेहचून तेथील साहित्य फेकून दिले. तसेच एक कंटेनर पलटी केला. खासदार उदयनराजे भोसले हे त्यावेळी घटनास्थळी हाेते. या घटनेमुळे आमदार शिवेंद्रसिंहराजे आणि खासदार उदयनराजे यांच्यात खडाजंगी हाेण्याची शक्यता वर्तवली जात आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply