Turkey Earthquake Update : पुन्हा हादरलं तुर्की! तुर्कीतमध्ये २४ तासांत तिसरा भूकंप, मृतांचा आकाडा चौदाशे पार; बचावकार्य सुरू

Turkey Earthquake Update : तुर्की आणि सीरिया सोमवारी पहाटे शतकातील सर्वात शक्तिशाली भूकंपाने हादरले आहेत. या भूकंपात 1,400 हून अधिक लोकांचा झोपेतच असतानाच मृत्यू झाला आहे. या भूकंपात अनेक इमारती जमनदोस्त झाल्या असून न्यूज एजन्सीने दिलेल्या माहितीनुसार भूकंपाचे धक्के ग्रीनलँडपर्यंत जाणवले.

आज सकाळी झालेल्या भूकंपानंतर पुन्हा एकदा तुर्की आणखी एका मोठ्या भूकंपाच्या धक्क्याने हादरले आहे. आज सकाळी झालल्या भूकंपामुळे येथे युद्धपातळीवर मदत आणि बचावकार्य सुरू करण्यात आले आहे. या दरम्यान तुर्कीमध्ये पुन्हा एकदा भूकंपाचे जोरदार धक्के बसले आहेत.

या भूकंपाची तीव्रता ७.६ रिश्टर स्केल इतकी मोजण्यात आली असून कहरामनमारा प्रांतातील एल्बिस्तान जिल्ह्यात हे धक्के बसल्याचे सांगितले जात आहे. तुर्कीमध्ये भूकंपामुळे 912 लोकांचा मृत्यू झाल्याचा दावा तुर्कीचे अध्यक्ष एर्दोगान यांनी केला आहे. तर सीरिया सरकारच्या नियंत्रित भागांमध्ये किमान 326 लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती एएफपी न्यीज एजन्सीने दिली आहे.

या भूकंपाचे धक्के सायप्रस आणि इजिप्तपर्यंत जाणवले, त्यावरून हा भूकंप किती तीव्र होता याचा अंदाज येऊ शकतो. सीरियाच्या राष्ट्रीय भूकंप केंद्राचे प्रमुख रायद अहमद यांनी सरकारी रेडिओला सांगितले की हा 'देशाच्या इतिहासातील सर्वात मोठा भूकंप' होता.

 


मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply