Turkey Earthquake : तीन दिवस आधीच भूकंपाचा अंदाज आलेला, पण लोकांनी त्या शास्त्रज्ञाला वेड्यात काढलं!

Turkey Earthquake : तुर्की आणि परिसरामध्ये आज सकाळी जवळपास ७.८ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाला. हा भूकंप इतका भीषण होता की यामध्ये १४०० हून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला आहे. पण एका शास्त्रज्ञाने हा भूकंप होणार अशी भविष्यवाणी तीन दिवसांपूर्वीच केल्याचा दावा आता करण्यात येत आहे.

तीन दिवसांपूर्वी फ्रँक हुगरबीट्स या संशोधकाने सोलार सिस्टीम जॉमेट्री सर्वे, भूकंपाच्या हालचालींवर लक्ष ठेवणाऱ्या सर्वेक्षणाच्या आधारे सांगितलं होतं की तुर्की, सिरीया, जॉर्डन आणि लेबनन या भागांमध्ये जवळपास ७.५ तीव्रतेचा भूकंप होऊ शकतो. ट्वीटरवर ही चर्चा झाली होती. पण ट्वीटरने त्याला छद्म - वैज्ञानिक म्हटलं आणि त्याच्या आधीच्या भविष्यवाणीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केलं.

हा भूकंप झाल्यानंतर पुन्हा एकदा हुगरबीट्सने आपलं हे ट्वीट शेअर केलं आहे. या ट्वीटनंतर तीनच तासांमध्ये तुर्कीमध्ये ७.६ रिश्टर स्केलचा भूकंप झाला. मात्र अनेकांनी या संशोधकाच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. त्याचा अंदाज बरोबर येऊनही अनेकांनी त्याला दिशाभूल करणारा अभ्यासक म्हटलं आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply