Tulja Bhavani Temple : तुळजाभवानी दर्शन मंडपावरून वाद पेटला; आज तुळजापूर बंदची हाक; काय आहे नेमकं प्रकरण?

Tulja Bhavani Temple :आज तुळजापूर बंदची हाक देण्यात आली आहे.  तुळजाभवानी मंदीर विकास प्रारूप आराखड्यातील दर्शन मंडपाच्या जागेवरून वाद सुरु झाला आहे. दर्शन मंडप हा घाटशीळ येथे करण्यास कांही पुजारी, व्यापारी आणि कांही स्थानिक नागरिकांचा विरोध आहे. त्यामुळे त्यांच्याकडून तुळजापूर शहर बंदचे आवाहन करण्यात आले आहे. तुळजाभवानी मातेचा शारदीय नवरात्र उत्सव सुरु आहे. देवीची मंचकी निद्रा सुरु आहे. तसेच 15 ऑक्टोबरला घटस्थापना होणार असून, याची तयारी अंतीम टप्प्यात असताना विकास आराखडा आणि त्यातील काही मुद्यावर आक्षेप घेतला जात आहे. तर काही पुजारी आक्रमक झाले असून, आज तुळजापूर बंदची हाक देण्यात आली आहे. 

तुळजाभवानी मंदीर विकास प्रारूप आराखड्यातील दर्शन मंडपाच्या जागेवरून वाद पाहायला मिळत आहे.दर्शन मंडप हा तुळजाभवानी देवीच्या मुख्य महाद्वार येथे असावा अशी पुजारी, व्यापारी यांची मागणी आहे. दर्शन मंडप जागा बदलल्यास व्यापाऱ्यांसह स्थानिक नागरिकांचे नुकसान होणार असल्याचा आरोप केला जात आहे. त्यामुळे आज तुळजापूर बंदची हाक देण्यात आली असून, सकाळपासून मंदिर परिसरात असलेल्या दुकाने बंद ठेवण्यात आल्या आहेत. त्यामुळे दर्शनासाठी आलेल्या भाविकांना मोठी अडचणीचा सामना करावा लागत असून, या बंदचे चित्र 10 वाजेनंतर स्पष्ट होणार आहे. 

Action On Drugs In Solapur : मुंबई, नाशिक पाठोपाठ सोलापूरातही ड्रग्सचा गोरख धंदा; मुंबईच्या गुन्हे शाखेकडून पर्दाफाश

काय आहे प्रकरण? 

तुळजाभवानी मंदीर संस्थान मंदिराचे विश्वस्त असलेले भाजप आमदार राणा जगजीतसिंह पाटील यांच्या संकल्पनेतुन मंदिर परिसराचा विकास आराखडा तयार करण्यात आला आहे. अराखड्याचे बुधवारी सायंकाळी 5 वाजता तुळजाभवानी मंदीर संस्थान प्रशासकीय कार्यालयासमोर सादरीकरण होणार आहे. 15 ऑक्टोबर पर्यंत यावर सुचना भाविक, पुजारी, व्यापारी, स्थानिक नागरिक यांना करता येणार आहे.  16 ते 17 ऑक्टोबर हे दोन दिवस समक्ष सूचनावर चर्चा होणार आहे. 20 ऑक्टोबर पर्यंत नागरिक व भाविकांनी केलेल्या सुचनावर तांत्रिक व प्रशासकीय विभागाकडून अभिप्राय घेतला जाईल व त्यानंतर 26 ऑक्टोबर पर्यंत जिल्हाधिकारी यांना याबाबतचा अंतीम अहवाल सादर करण्यात येणार आहे. मात्र, याच विकास अराखड्याला विरोध केला जात आहे.  

राणा जगजीतसिंह पाटील यांची प्रतिक्रिय...

दरम्यान या सर्व प्रकरणावर आणि आज पुकारण्यात आलेल्या बंदबाबत राणा जगजीतसिंह पाटील यांची प्रतिक्रिया आली आहे. "सर्वांना विनंती आहे की, बंद वैगरे करणं योग्य वाटत नाही. जे काही काम करण्यात येत आहे ते आपल्याला विश्वासात घेऊनच केले जात आहे. सर्वांना अंतिम आराखडा दाखवून आणि सर्वांची मान्यता घेतल्याशिवाय आपण पुढे जाणार नाही. त्यामुळे सर्वांना विनंती आहे की, या विशाल कामामध्ये आपली सकारात्मक राहावी”, असे राणा जगजीतसिंह पाटील यांनी म्हटले आहे. 

 

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply