Truck Driver Strike : एपीएमसीत शुकशुकाट, मुंबईत भाज्यांचे दर वाढणार; नागपुरातील संत्रा लिलाव ठप्प

Truck Driver Strike : नव्या हिट अॅड रन कायदा  विराेधात आज (मंगळवार) दुस-या दिवशी देखील राज्यभरात ट्रक चालकांचे आंदाेलन सुरु आहे. यामुळे ट्रक चालकांच्या संपाचा काहीसा फटका एपीएमसी भाजीपाला मार्केटवर झाला आहे.

या आंदाेलनामुळे एपीएमसी बाजारात परराज्यातील माल आलेला नाही. राज्यातील काही भागातून भाजीपाल्याची आवक काही प्रमाणात झाली आहे. परिणामी भाजीपाल्याची आवक पन्नास टक्क्यानी घटली आहे.

Solapur News : सोलापुरात इंधन टँकर चालकांचा संप मागे, पोलिसांच्या मध्यस्थीने पेट्रोल-डिझेल पुरवठा सुरु

दरम्यान सध्या एपीएमसीत ग्राहक देखील घटल्याचे आज दिसून आले आहे. त्यामुळे भाजीपाल्याला म्हणावा तितका उठाव झालेला नाही. ट्रक चालकांचा संप सुरु राहिल्यास भाजीपाल्यांची आवक ठप्प होऊन त्याचे दर मोठ्या प्रमाणावर वाढतील अशी शक्यता व्यापा-यांनी साम टीव्हीशी बाेलताना व्यक्त केली.

संत्रा नगरीस संपाचा फटका

नागपूरची ओळख ही संत्रा नगरी म्हणून देखील आहे. सध्या ट्रक चालकाचा संपाचा परिणाम संत्रा बाजारपेठेवर पडलेला दिसून येत आहे. आवक घटल्यामुळे संत्राचे दर वाढलेले दिसत नाही. तरी देखील बाजारात व्यापारी संत्रा खरेदी करत नसल्याचे चित्र आहे.

या संपामुळे संत्रा बाहेर पाठवू शकत नसल्यामुळे संत्रा लिलावाकडे देखील अनेकांनी पाठ फिरवली आहे. याचा फटका जो आहे तो शेतकऱ्यांना आणि ज्यांनी संत्रा घेऊन आले आहेत त्या व्यापारी वर्गास बसत आहे.

ट्रक चालकाच्या संपामुळे संत्रा गाडी भरली होत नाही. संत्रा उपलब्ध असताना बाजार ओस पडला आहे. यामुळे दोघांनाही या फटक्याचा परिणामाला समोर जाव लागत आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply