Torres Jewellers Fraud : ३ लाख मुंबईकरांना लुटलं, १३ कोटींची फसवणूक; घबाड घेऊन पळ काढताना तिघांना अटक

Mumbai : झटपट श्रीमंतीच्या नादात ३ लाख मुंबईकरांना टोरेस कंपनीने गंडा घातलाय. या प्रकरणी शिवाजी पार्क पोलिसांनी ३ जणांना अटक केली आहे. शिवाजी पार्क पोलिसांनी उझबेकिस्तानची रहिवासी असलेली जनरल मॅनेजर तानिया कसातोवा, संचालक सर्वेश अशोक सुर्वे आणि रशियन नागरिक असलेली स्टोअर मॅनेजर व्हॅलेंटिना गणेश कुमार या तिघांना अटक केली आहे.टोरेस कंपनीने केलेल्या फसवणूक प्रकरणात अटक करण्यात आलेले तिघेही दादर कार्यालयातील रक्कम, दागिने घेऊन पळण्याच्या तयारीत असतानाच पोलिसांनी त्यांना बेड्या ठोकल्या. या कंपनीचा संस्थापक जॉर्न कार्टर आणि व्हिक्टोरीया कोवालेंको हे दोघेही युक्रेनला पसार झाल्याची माहिती समोर आली आहे. तर मुख्य कार्यकारी अधिकारी असलेला तौफिक रियाज आणि सीए अभिषेक गुप्ता दोघेही भारतात असून त्यांच्याविरुद्ध लूक आऊट नोटीस जारी करण्यात आली आहे

.टोरेस कंपनीच्या दादर, गिरगाव, कांदिवली, कल्याण, सानपाडा, मीरा रोड या सहा ठिकाणी शाखा आहेत. या फसवणूक प्रकरणी कपंनीच्या दोन संचालक आणि ३ वरीष्ठ अधिकाऱ्यांविरोधात शिवाजी पार्क पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकानेही मंगळवारी या फसवणूक प्रकरणाचा आढावा घेतला. आर्थिक गुन्हे शाखा या प्रकरणाचा तपास करणार आहे.

Sangli Court : युवकाच्या खूनप्रकरणी ५ जणांना जन्मठेप; सांगली न्यायालयाचा निर्णय

दादरच्या शिवाजी पार्क परिसरात टोरेस स्टोअर चालवणाऱ्या प्लॅटिनम हर्न प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या अधिकाऱ्यांविरोधात शिवाजी पार्क पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संचालक सर्वेश अशोक सुर्वे आणि व्हिक्टोरिया कोवालेन्को, सीईओ तौफिक रिया उर्फ जॉन कार्टर, तान्या कास्तोवा आणि व्हॅलेंटिना कुमार यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भाजी विक्रेते प्रदीप कुमार वैश्य यांच्या तक्रारीच्या आधारे हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारदाराने या कंपनीच्या पॉन्झी स्कीममध्ये गुंतवणूक केली होती.

टोरेस कंपनीने १३ कोटींपेक्षा जास्त रुपयांची फसवणूक केली आहे. ही कंपनी गुंतवणूकदारांना सोनं-चांदी आणि मॉइसॅनाइटमध्ये गुंतवणूक करण्याचे आणि त्यांना भरघोस परतावा देण्याचे आमीष देत होती. टोरेस ज्वेलर्स असं या कंपनीचे नाव असून हे फसवणुकीचे प्रकरण समोर आल्यानंतर या कंपनीच्या शाखांबाहेर गुंतवणुकदारांनी मोठी गर्दी केली आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply