ड्रायफ्रुट्स खाण्याची ही आहे योग्य पद्धत, थोडी बदला; निरोगी राहाल

आरोग्यासाठी सुकामेवा हा फारच फायद्याचा असतो. त्यामुळे प्रत्येकाच्या घरी बदाम, काजू, अक्रोड, मनुका, अंजीर असे वेगवेगळे प्रकार अगदी नक्कीच असतात. सुक्यामेव्यामध्ये अनेक पोषकत्वे असतात. त्यामुळेच त्याचा समावेश अनेक जण वेगवेगळ्या पद्धतीने डाएटमध्ये केला जातो. पण सुकामेवा हा योग्य पद्धतीने खाल्ला तरच त्याचे जास्तीत जास्त फायदे मिळण्यास मदत मिळते. अशी नेमकी कोणती पद्धत आहे ज्याने सुकामेव्याचे जास्तीत जास्त फायदे मिळतात ते जाणून घेऊया.

हवामान कोणतेही असो, शरीर निरोगी ठेवण्यासाठी सुका मेवा खा. मात्र, उन्हाळ्यात ड्रायफ्रूट्स खाण्याची पद्धत काहीशी वेगळी असते. ड्रायफ्रुट्सचा प्रभाव खूप गरम असतो. त्यामुळे उन्हाळ्यात सुक्या मेव्याचे सेवन मर्यादित प्रमाणात करावे. तसंच सुका मेवा त्यांच्या मूळ स्वरूपात खाणे योग्य आहे की भिजवून? असा प्रश्न तुम्हाला पडला असेलच. काही ड्रायफ्रूट्स कच्चे तर काही पाण्यात भिजवून खावेत, असे आरोग्य तज्ज्ञांचे मत आहे. पिस्ते, काजू, खजूर त्यांच्या मूळ स्वरूपात खाणे कधीही चांगले. पण मनुका, बदाम यांसारखे ड्रायफ्रूट्स भिजवून खाऊ शकतात.

भिजवलेले ड्रायफ्रुट्स खाण्याचे फायदे

  1. आपण अनेकदा भिजवलेले बदाम खातो. कारण ते सेवन करणे सोपे जाते. पण असे केल्याने होणारे फायदेही तुम्हाला माहित असले पाहिजेत. बदामामध्ये सालीमध्ये टॅनिन असते जे पोषक तत्वांचे शोषण रोखते. भिजवून खाल्ल्यास त्याची साल वेगळी होते.
  2. मनुके सहसा थेट खाल्ले जातात, परंतु जर तुम्ही ते भिजवून खाल्ले तर त्यात असलेले हानिकारक प्रिझर्वेटिव्ह निघून जातात आणि तुमच्या आरोग्याला फारसा त्रास होत नाही.
  3. भिजवलेले ड्रायफ्रूट्स खाल्ल्याने त्यातील फायटिक ऍसिडचे प्रमाण कमी होते आणि ते पचायला सोपे होते.
  4. अक्रोड आणि बदाम हे उष्ण असतात. त्यामुळे उन्हाळ्यात नुकसान होऊ शकते. पाण्यात भिजवल्याने त्याची उष्णता पाण्यात विरघळते.
  5. अनेक ड्रायफ्रूट्स काही दिवस भिजवून ठेवल्यास त्यांना अंकुर फुटू लागतात, त्यामुळे या गोष्टींचे पोषणमूल्य वाढते.
  6. भिजवलेले ड्रायफ्रूट्स खाल्ल्याने त्याची चव सुधारते, त्यातील पाण्याचे प्रमाण वाढते, त्यामुळे ते चावणे सोपे जाते, ज्यांचे दात कमकुवत आहेत त्यांनी काजू भिजवल्यानंतर खावे.

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply