The Kashmir Files: सिनेमाच्या कमाईवरुन रंगला वाद? करणी सेनेचा ईशारा

 'द काश्मिर फाईल्स' या विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित सिनेमाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. या सिनेमानं केव्हाच १०० करोडच्या क्ल्बमध्ये आपला दरारा निर्माण केला आहे. दुसऱ्या आठवड्यातही प्रेक्षक सिनेमा पहायला थिएटरमध्ये गर्दी करताना दिसत आहे. लो बजेट मध्ये बनलेल्या सिनेमानं बॉक्सऑफिसवर केलेल्या कमाईची देखील सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे. करणी सेनेने 'द काश्मिर फाईल्स' सिनेमाच्या निर्मात्या-दिग्दर्शकांना विनंती करीत सिनेमाच्या कमाईतील ५० टक्के रक्कन दान करावी अशी मागणी केली आहे. ही रक्कम विस्थापित काश्मिरी पंडितांच्या मदतीसाठी वापरता येईल असं त्यांचं म्हणणं आहे. करणी सेनेनं निर्माते,दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री आणि झी स्टुडिओजला यांसदर्भात आवाहन केलं आहे.

एका वृत्तत्राशी संवाद साधताना करणी सेनेचे अध्यक्ष सूरज पाल सिंग अमू यांनी चंदिगढमध्ये 'द काश्मिर फाईल्स' या सिनेमाविषयी एक महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे. त्यांनी थेट 'द काश्मिर फाईल्स' सिनेमाच्या निर्मात्या-दिग्दर्शकांना सिनेमाच्या कमाईतील ५० टक्के रक्कम दान करण्याची मागणी केली आहे. ते म्हणाले,''काही राज्यांत हा सिनेमा करमुक्त घोषित केला गेला आहे. त्यामुळे आता तो सर्वसामान्य लोकही पाहू शकतात. तेव्हा आता या सिनेमाच्या कमाईतील ५० टक्के रक्कम काश्मिरी पंडितांच्या कल्याणासाठी दान करायला हवी. सिनेमाचे निर्माते-दिग्दर्शकांनी यासंदर्भात पुढाकार घ्यायला हवा. त्यामुळे केवळ सिनेमात कथा दाखवण्यापुरतं नाही तर त्या सत्य घटनेप्रसंगी बळी पडलेल्या पीडितांच्या सोबत सिनेमाची टीम उभी आहे याची देखील खात्री होईल''. करणी सेनेचे सूरज पाल सिंग अमू पुढे असंही म्हणाले की,'' सिनेमाच्या निर्मात्या-दिग्दर्शकांनी जर याबाबतीत पावलं उचलली नाही तर त्यांना काश्मिरी पंडितांच्या भल्याची काळजी नव्हती आणि फक्त सिनेमासाठी त्यांच्या व्यथांचा वापर केला गेला असं मानलं जाईल. आणि तसं जर झालं तर करणी सेनेचे लोक हा सिनेमा पाहणार नाहीत''.

 


मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply