मुंबई : मशिदींवरील भोंग्यांचा विषय कायमचा संपवायचाय; राज ठाकरेंचे मनसैनिकांना दुसरे खुले पत्र

मुंबई: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनसैनिकांना एक पत्र लिहिले आहे. या पत्रात त्यांनी मशिदीवरील भोंग्या विषयी माझं पत्र तुम्ही राहत असलेल्या परिसरातील घरा घरात देण्याचे आवाहन राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना केलं आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढी पाडवा मेळाव्यात मशिदीवरील भोंग्याविरोधात राज्य सरकारला इशारा दिला होता. तेव्हापासून मनसेने मशिदीवरील भोंग्याविरोधात आंदोलन सुरु केलं होत.

'मशिदींवरील भोंग्याच्या विषयाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने हात घातल्यानंतर राज्यातलंच नव्हेतर देशातल राजकारण ढवळून निघालं. आता हा विषय आपल्याला कायमचा संपवायचा आहे. त्यासाठी आपला विचार सर्वापर्यंत पोहचवायलाच हवा. म्हणूनच माझ एक पत्र मराठी, हिंदी, इंग्रजी या भाषेत आपल्या पदाधिकाऱ्यांपर्यंत पोहचवण्यात आले आहे. ते त्यांच्याकजून घ्या आणि कामाला लागा', अस या पत्रात राज ठाकरे यांनी म्हटले आहे.

'तुम्ही एकच करायचं आहे. माझ पत्र तुम्ही राहता त्या परिसरातील घराघरात स्वत: नेऊन द्यायचा आहे. कारण व्यापक लोकसहभागाशिवाय आपलं हे आंदोलन यशस्वी होणार नाही, असंही या पत्रात म्हटले आहे. मला खात्री आहे, जास्तीत जास्त लोकांपर्यंत हे पत्र पोहोचवण्याच्या कामात तुमच्याकडून जराही कुचराई होणार नाही, असा विश्वासही राज ठाकरे यांनी व्यक्त केला आहे.

मनसेच्या गुढी पाडवा मेळाव्यात राज ठाकरे यांनी मशिंदीवरील भोंग्याविरोधात राज्य सरकारला इशारा दिला होता. भोंगे उतरवले नाही, तर भोंग्यासमोर स्पीकरवर हनुमान चालीसा लावण्याचा इशारा दिला होता. यावरुन राजकारण ढवळून निघाले होते. या मेळाव्यानंतर राज ठाकरे यांनी रतीन सभा घेतल्या. औरंगाबादमध्येही सभा घेऊन ठाकरे यांनी महाविकास आघाडी सरकारला इशारा दिला.

सभेत राज ठाकरे यांनी अयोध्याला जाणार असल्याची घोषणा केली होती. पण राज ठाकरे यांनी उत्तर प्रदेशचे खासदार ब्रिजभूषण सिंह यांनी विरोध केला होता. त्यामुळे राज ठाकरे यांनी अयोध्या दौरै रद्द केला होता. या दौऱ्यावरुन आरोप प्रत्यारोप सुरु होते. शिवसेना नेते संजय राऊत यांनी या दौऱ्यावरुन टीका केल्या होत्या.

 


मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply