Thane Kalwa Hospital : कळवा रुग्णालयातील १८ रुग्णांच्या मृत्युप्रकरणी चौकशी समिती गठीत; डॉक्टर-कर्मचाऱ्यांवर होणार कारवाई?

Thane Kalwa Hospital: ठाण्यातील कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात २४ तासांत १८ रुग्णांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेनंतर एकच खळबळ उडाली होती. या घटनेनंतर विरोधकांनी सरकारला धारेवर धरलं. या प्रकरणी सार्वजनिक आरोग्य विभागाकडून चौकशीसाठी समितीची स्थापना करण्यात आली आहे. आरोग्य सेवा आयुक्त या समितीचे अध्यक्ष असून या समितीत जिल्हाधिकारी, ठाणे महानगर पालिका, जिल्हा शल्यचिकित्सा असे एकूण ९ जणांचा समावेश आहे.

महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी ठाणे येथील कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात गेल्या २४ तासांत १८ रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती दिली होती. त्यानंतर स्थानिक प्रशासनात एकच खळबळ उडाली होती. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात येईल, समितीच्या अहवालानुसार पुढील कारवाई करण्यात येईल, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली होती.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या आदेशानंतर कळवा रुग्णालयातील रुग्णांच्या मृत्यू प्रकरणावर चौकशी नेमण्यात आली आहे. या समितीमध्ये ठाण्याचे जिल्हाधिकारी, महानगर आयुक्त, मुंबईचे आरोग्य सेवा संचालक, ठाणे जिल्हा शल्यचिकित्सक, राज्यस्तर आरोग्य सेवा सहसंचालक, सहायक संचालक (वैद्यकीय आरोग्य देखभाल दुरुस्ती पथक), भिषकतज्ज्ञ, ठाणे मंडळाचे आरोग्य सेवा उपसंचालक यांचा सामावेश करण्यात आला आहे.

Afghanistan Blast : अफगाणिस्तानातील हॉटेलमध्ये भीषण स्फोट; 3 लोकांचा मृत्यू,7 जखमी

कळवा रुग्णालय प्रकणावर शिंदे म्हणाले की, ठाणे येथील रुग्णालयात घडलेली रुग्णांच्या मृत्यूची घटना दुर्दैवी आहे. रुग्णालय प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार यातील काही रुग्ण हे अत्यंत क्रिटिकल स्थितीत दाखल झाले होते, काही रुग्ण खासगी रुग्णालयातूनही संदर्भित झाले होते'.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply