Thane Crime News : दिवा रेल्वे स्थानकावरील 12 रिक्षांची युवकाकडून ताेडफाेड, युनियनची पाेलिसांत धाव

 

Thane Crime News : दिवा रेल्वे स्टेशन जवळ आज (गुरुवार) पहाटेच्या सहा सुमारास अज्ञात युवकाने 12 रिक्षा फोडल्याची घटना घडली आहे. संबंधितास रिक्षा चालकांनी पकडण्याचा प्रयत्न केला असता त्याने शस्त्र काढल्याने सर्वजण भयभीत झाले. त्याचा फायदा घेत युवकाने घटनास्थळावरुन पळ काढला.

या घटनेनंतर शिवशक्ती रिक्षा युनियनचे चालक व मालक यांनी दिवा पोलिस ठाण्यात धाव घेतली. या घटनेबाबतची माहिती पाेलिसांना दिली. वरिष्ठ पाेलिसांनी तात्काळ काही कर्मचा-यांना युवकाच्या शाेधासाठी पाठविले.

Pune Metro : गुड न्यूज! पुणेकरांचा प्रवास आणखी सुखकारक होणार, स्वारगेटपर्यंतची मेट्रोसेवा गणेशोत्सवाआधीच सेवेत

शिवशक्ती रिक्षा युनियनचे चालक व मालक यांनी घटनेची तक्रार पाेलिसांत नाेंदवली आहे. पाेलिसांनी युवकाचा शाेध सुरु केला असून लवकरच त्याला ताब्यात घेतले जाईल. रिक्षा चालकांनी संयम ठेवावा असे आवाहन पाेलिसांनी केले आहे.

 

 

 

 



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *