Thackeray VS Shinde : तुम्ही शिवसेना आहे की नाही हे बहुमत चाचणी ठरवू शकत नाही, सरन्यायाधीशांचं महत्त्वाचं निरीक्षण

राज्यातील सत्तासंघर्षावरील महत्त्वाची सुनावणी सर्वोच्च न्यायालयात सुरु आहे. ही सुनावणी आता अंतिम टप्प्यात आली आहे. तुम्ही शिवसेना आहे की नाही हे बहुमत चाचणी ठरवू शकत नाही, असे खडेबोल सरन्यायधीशांना शिंदे गटाच्या वकिलांना सुनावले आहेत.

पक्ष फुटीवर प्रश्नचिन्ह असताना बहुमत चाचणी घेतली असल्याचं महत्त्वाचं निरीक्षण सरन्यायाधीशांनी आजच्या सुनावणीत नोंदवलं आहे. आमदारांना विधानसभेत मतदान करता आलं, कारण अपात्रतेचा निर्णय झाला नव्हता, असं देखील सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी म्हटलं. 

सरकार अस्थिर होण्यामागण्याच्या कारणांचाही विचार केला गेला पाहिजे. तसेच बहुमत चाचणी घेण्याची गरज का निर्माण झाली? अपात्र आमदारांना मतदानाचा अधिकार कसा मिळाला? असे प्रश्न सरन्यायधीशांनी उपस्थित केले. 

एकनाथ शिंदे यांनी बंड केले त्यावेळी त्यांनी त्यांच्याकडे बहुमत आहे सांगितलं जात होतं. बहुमत आपल्याकडे असल्याने खरी शिवसेनाही आम्हीच आहोत असा दावाही त्यांच्याकडून केला जात होता. मात्र आमदारांना विधानसभेत मतदान करता आले कारण अपात्रतेचा निर्णय झाला नव्हता. तुमच्याकडे विधिमंडळात बहुमत आहे. याचा अर्थ तुम्ही पक्ष होत नाही, असं सरन्यायाधीशांनी म्हटलं आहे.

उद्धव ठाकरे विरुद्ध एकनाथ शिंदे या सत्ता संघर्षात कुणाचा विजय होणार, हा निकाल येत्या काही दिवसातच लागणार आहे. यावेळी ठाकरे गटाकडून आज सकाळच्या सत्रात युक्तीवाद केला. तर दुपारच्या सत्रात शिंदे गटाकडून युक्तीवाद करण्यात आला.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply