Thackeray Camp VS MNS in Vasai : ठाकरे गटाच्या स्थानिक नेत्याला मनसे कार्यकर्त्यांकडून ऑफिसमध्ये घुसून मारहाण, १४ जणांविरोधात गुन्हे दाखल

Political News : शिवसेना ठाकरे गटाचे वसईतील स्थानिक नेते अनिल चव्हाण यांच्या कार्यालयावर मनसे कार्यकर्त्यानी हल्ला करून त्यांना मारहाण केली आहे. या प्रकरणी आचोळे पोलीस ठाण्यात १४ मनसे कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मनेसे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांच्या विरोधात आक्षेपार्ह विधान केल्यामुळे हा हल्ला केल्याचे मनसैनिकांनी सांगितले. 

शिवेसना ठाकरे गटातर्फे शुक्रवारी वालीवच्या प्रभाग समिती ‘जी’ च्या कार्यालयावर पाणी टंचाईविरोधात मोर्चा काढण्यात आला होता. मात्र अधिकाऱ्यांनी मोर्च्याच्या शिष्टमंडळाला वेळ दिला नाही. त्यावेळी शिवसेना ठाकरे गटाचे नेते ॲड. अनिल चव्हाण यांनी मनसे जिल्हाप्रमुख अविनाश जाधव यांना भेटायला वेळ असतो असे म्हणत अपशब्द काढले.

यामुळे संतापलेल्या मनसेचे स्थानिक पदाधिकारी प्रवीण भोईर, पंकज सावंत आदींसह १४ जणांनी रविवारी संध्याकाळी चव्हाण यांच्या कार्यालयात घुसून त्यांना मारहाण केली. यावेळी चव्हाण यांच्या कार्यालयातील साहित्याची नासधूस करण्यात आली. 

याप्रकरणी ॲड चव्हाण यांनी पेल्हार पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर मनसेचे प्रवीण भोईर, पंकज सावंत, अमित पाटील, रवी पाटेकर यांच्यासह १० अनोळखी जणांविरोधात मारहाण केल्याप्रकरणी विविध कलमाअंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या हल्ल्याप्रकरणी सोमवारी संध्याकाळपर्यंत कुणालाही अटक करण्यात आलेली नाही.



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *