Taloda News : गुटखा विक्री करणाऱ्या दोन दुकानदारांवर गुन्हा दाखल; ९५ हजाराचा मुद्देमाल जप्त

Taloda News :   प्रतिबंधित असलेला गुटखा व सुगंधित तंबाखूची विक्री आणि साठा करणाऱ्या दोन दुकानदारांवर कारवाई करण्यात आली आहे. या दुकानदारांकडून सुमारे ९५ हजाराच्या मुद्देमाल जप्त करत या दोन्ही दुकानदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हि कारवाई  तळोदा शहरात करण्यात आली आहे.

तळोदा शहर व तालुका गुजरात हद्दीला लागून असल्याने प्रतिबंधित गुटखा व तंबाखूची सर्रास खरेदी विक्री होत असते. अनेकदा कारवाई होऊन देखील सर्रासपणे वाहतूक व विक्री सुरूच असते.  गुजरात राज्यातील तळोद्यापासून जवळ असलेल्या गावांमध्ये साठा करून खरेदी विक्री करण्यासाठी मुद्देमाल शहर व तालुक्यात आणला जात असतो. अशाच प्रकारे तळोदा शहरातील दोन दुकानदारांवर पोलिसांनी कारवाई केली आहे. 

Pune News : स्वारगेटला निघालेल्या एसटी बसला अपघात, 20 प्रवासी जखमी

पोलिसांनी  केलेल्या या कारवाईत नगरपालिकेसमोरील दुर्गा किराणा दुकानावरून पोलिसांनी विविध प्रकारचे तंबाखू व गुटक्याचे पाऊच जप्त केले आहेत. याची एकूण किंमत ४३ हजार ९२० रुपये आहे. तर दुसऱ्या कारवाईत एका पीठ गिरणी मालकाकडून ५० हजार ९८ रुपये किमतीचा प्रतिबंधित गुटखा व सुगंधित तंबाखू जप्त करण्यात आले आहे. या दोन्ही दुकानदारांवर विविध कलमान्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक धर्मेंद्र पवार करीत आहेत. 

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply